digital products downloads

गारखेड्यात रेल्वेच्या जेसीबीने केबल तोडली: 33 केव्ही वीजपुरवठा खंडित; महावितरणच्या प्रयत्नाने मध्यरात्री पूर्ववत – Chhatrapati Sambhajinagar News

गारखेड्यात रेल्वेच्या जेसीबीने केबल तोडली:  33 केव्ही वीजपुरवठा खंडित; महावितरणच्या प्रयत्नाने मध्यरात्री पूर्ववत – Chhatrapati Sambhajinagar News



छत्रपती संभाजीनगर येथील गारखेडा परिसरात रेल्वे विभागाच्या जेसीबीने खोदकाम करताना महावितरणची भूमिगत ३३ केव्ही वीजवाहिनी तोडली. यामुळे गारखेडा परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न करून मध्यरात्री अडीच वाजता हा वीजपुरवठा पूर्ववत केला. मंगळवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. महापारेषणच्या १३२ केव्ही सातारा उपकेंद्रातून महावितरणच्या ३३ केव्ही सूतगिरणी उपकेंद्राला वीजपुरवठा होतो. शिवाजीनगर भुयारी मार्गाजवळ रेल्वेच्या कामासाठी खोदकाम सुरू असताना जेसीबीने ही भूमिगत केबल नादुरुस्त केली, ज्यामुळे सूतगिरणी उपकेंद्राचा वीजपुरवठा ठप्प झाला. वीजपुरवठा खंडित होताच महावितरणने तातडीने पर्यायी व्यवस्था केली. सूतगिरणी आणि शिवाजीनगर उपकेंद्राचा संपूर्ण भार १३२ केव्ही चिकलठाणा उपकेंद्रातून येणाऱ्या ३३ केव्ही वाहिनीवर वळवण्यात आला. मात्र, उन्हाळ्यातील विजेची वाढती मागणी लक्षात घेता, रात्री ७.३० वाजता चिकलठाणा वाहिनी ओव्हरलोड झाली. सुरक्षिततेचा उपाय म्हणून महावितरणला भार व्यवस्थापन करावे लागले. यामुळे शिवाजीनगर आणि सूतगिरणी उपकेंद्रावरील ११ केव्ही फीडर अर्धा-अर्धा तास बंद ठेवून ग्राहकांना रोटेशननुसार वीजपुरवठा करण्यात आला. दरम्यान, महावितरणचे अभियंते आणि कर्मचाऱ्यांनी बिघाड दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. भूमिगत वाहिनीची तपासणी करून दुरुस्ती सुरू करण्यात आली. केबलला जॉइंट देण्याचे काम अत्यंत जिकिरीचे आणि गुंतागुंतीचे होते. मध्यरात्री २.३० वाजता भूमिगत वाहिनीच्या केबलचे दोन जॉइंट मारून दुरुस्ती व चाचणी झाल्यानंतर सातारा ३३ केव्ही वाहिनी सुरू झाली आणि दोन्ही उपकेंद्रावरील सर्व ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp