
नागपुरात अटक केलेला शिवाजी राम राठोड हा सोलापूर जिल्ह्यातील कवडे तांडा (ता. उत्तर सोलापूर) गावचा. भिशीच्या नावाने कवठे तांडा परिसरातील नागरिकांना लाखो रुपयांचा गंडा घालून सात महिन्यांपूर्वी तो पुण्याला पसार झाला. पदवीधर शिवाजी राठोड हा कवठे तांडा येथे दहा बाय दहाच्या दोन खोल्यांच्या घरात राहत होता. त्याने नुकताच कर्ज काढून लॅपटॉप घेतला होता. हुशार असलेल्या राठोडने कला शाखेत पदवी प्राप्त केली. वडील राम यांच्या मृत्यूनंतर तो कर्जबाजारी झाला. पैशासाठी तगादा लागल्याने सात महिन्यांपूर्वी लॅपटॉपसह घरातून पुण्याला पळून गेला. तेथे आयईडी ठेवल्याच्या आरोपात अडकला. तपासासाठी पुण्याचे पोलिस कवठे तांडा येथे गुरुवारी येऊन गेल्याचे सांगण्यात येत आहे. ओळख पटू नये म्हणून दाढी तांड्यातील नागरिकांकडून 1 ते 3 लाख अशी अनेक जणांकडून सुमारे 10 ते 15 लाखांपेक्षा जास्त रक्कम भिशी चालवण्यासाठी घेतली. पैसे परत करण्याची वेळ येताच मुदत देत राहिला. घराला कुलूप, पोलिसांची चौकशी कवठे तांड्यावरील शिवाजी राठोड याचे घर शुक्रवारी बंद होते. गुरुवारी रात्री पुणे पोलिस कवठे तांडा येथे येऊन गेले. साधा कपड्यात पोलिस तांड्यावर फिरत होते. यूट्यूबवरून बॉम्बचे प्रशिक्षण, मांजरीमध्ये आहे बूट व कपड्यांचे दुकान शिवाजी हा सोलापूरचा रहिवासी असून कामानिमित्त पुण्यातील मांजरी भागात 8 बाय 8 च्या खोलीत पत्नीसह राहण्यास आहे. मांजरीमध्ये बूट व कपड्यांचे त्याचे दुकान आहे. त्याला गुप्तरोगाचा त्रास असल्याने त्यावर उपचार करण्यासाठी तो उषाकिरण रुग्णालयात गेला होता, परंतु रुग्णालयाने उपचारासाठी 7 लाख लागतील, असे सांगितले. जवळ पैसे नसल्याने त्याने तोंडाला मास्क लावून रुग्णालयात जाऊन बॉम्बसदृश वस्तू ठेवून खंडणीचा कट रचला. त्याकरिता यूट्यूबवरून बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण घेतले. 160 रुपयांत ऑनलाइन डिजिटल घड्याळ त्याने विकत घेतले. 20 रुपयांचा पाइप, 50 रुपयांची तार, 15 रुपयांचा टेप व इतर साहित्य दुकानातून विकत आणले. त्याआधारे बॉम्बसदृश वस्तू त्याने बनवत ती घेऊन रुग्णालयातील टॉयलेटमध्ये जाऊन बेसिनखाली ती चिकटवण्याचा प्रयत्न केला, परंतु ती चिकटत नसल्याने त्याने पुन्हा दुकानात जाऊन 15 रुपयांचा डबल टेप आणला व ऑनलाइन पैसे दिले. नंतर पोलिस तपासात त्याचआधारे आरोपीचा माग काढण्यात पोलिसांना यश आले. वेशांतर करून नेपाळला जाण्याचा प्रयत्न बॉम्बसदृश वस्तू रुग्णालयात लावल्यानंतर आरोपीने ओळखीतील एकाला फोन करून बंद दुकान उघडण्यास लावून दाढी करून वेशभूषा बदलली. पुन्हा रुग्णालय परिसरात घटनेच्या दिवशी सायंकाळी साडेसात वाजता जाऊन पाहणी केल्यावर पोलिस तपास सुरू झाल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर पोलिसांनी वेगाने तपास करत मांजरी परिसरात छापेमारी केल्याने त्याने नेपाळला नात्यातील एका बहिणीकडे पळून जाण्याचा कट रचला. त्यापूर्वी 13 मे रोजी बहिणीला “पुण्यात उन्हाळा वाढला असून मी 2 महिने नेपाळला थंड वातावरणात जातो,’ असे त्याने सांगितले. पदवीधर शिवाजी सोलापूरजवळील कवठे तांड्याचा, भिशीच्या नावाने लाखोंना गंडवले हडपसर भागात उषाकिरण हॉस्पिटलच्या टॉयलेटमध्ये बॉम्बसदृश वस्तू ठेवणाऱ्या आरोपीला पकडण्यात पुणे पोलिस व एटीएसला नागपूर रेल्वे स्टेशन येथे यश आले. पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघडकीस आली असून आरोपी शिवाजी राम राठोड (30, रा. पाण्याच्या टाकीजवळ, कवठे, उत्तर सोलापूर, सध्या रा.मांजरी, पुणे) याने गुप्तरोगाचा उपचारांचा सात लाखांचा खर्च मिळवण्यासाठी संबंधित हॉस्पिटलमध्येच बॉम्बसदृश वस्तू केवळ 400 रुपयांत बनवून ठेवत पुणे शहर वेठीला धरत तसेच हजारपेक्षा अधिक पोलिस तपासकामात सक्रिय केल्याचे निष्पन्न झाले. संबंधित हॉस्पिटलच्या डॉक्टरांकडून 8 लाखांची खंडणी घेऊन स्वत:चा गुप्तरोगाचा उपचार करण्याचा त्याचा कट असल्याची माहितीदेखील तपासात समोर आली आहे, अशी माहिती पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. दरम्यान, आरोपीला नागपूरहून पुण्यात आणण्यासाठी 36 हजार रुपये खर्च आला.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.






