मुंबईत मंत्रालयाबाहेर वंचितचे आंदोलन: NEET पेपरफुटीवरून विद्यार्थ्यांचा आक्रोश, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी – Mumbai News

मुंबईत मंत्रालयाबाहेर वंचितचे आंदोलन:  NEET पेपरफुटीवरून विद्यार्थ्यांचा आक्रोश, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी – Mumbai News



NEET परीक्षांमधील पेपरफुटी व गैरव्यवहारामुळे देशातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागल्याच्या निषेधार्थ आज मंत्रालयाबाहेर मोठा हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. वंचित बहुजन आघाडी आणि ‘वंचित बहुजन युवा आघाडी’च्या कार्यकर्त्यांनी मंत्रालयासमोर “विद्यार्थी आक्रोश मोर्चा” काढत जोरदार निदर्शने केली. यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकार आणि परीक्षा घेणाऱ्या ‘NTA’ संस्थेविरोधात प्रचंड घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी मंत्रालयाबाहेर घोषणाबाजी
“विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध असो,” अशा घोषणा देत वंचितच्या कार्यकर्त्यांनी मंत्रालयाचा परिसर वेढण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनाद्वारे वंचित बहुजन आघाडीने प्रामुख्याने दोन मोठ्या मागण्या लावून धरल्या आहेत: 1 ) केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा: परीक्षांमधील सातत्यपूर्ण गैरव्यवहार आणि पेपरफुटीची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा तातडीने राजीनामा द्यावा. 2 ) ‘NTA’ संस्था बरखास्त करा: विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त करणारी ‘NTA’ (National Testing Agency) ही संस्था तात्काळ रद्द करण्यात यावी. तसेच, ‘NTA’ अंतर्गत घेण्यात येणाऱ्या सर्व राष्ट्रीय पातळीवरील परीक्षांची संपूर्ण जबाबदारी ‘UPSC’ (Union Public Service Commission) कडे सोपवण्यात यावी, जेणेकरून परीक्षांमध्ये पारदर्शकता राहील. पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड मंत्रालयासारख्या संवेदनशील ठिकाणी अचानक झालेल्या या आंदोलनामुळे पोलीस प्रशासनाची पळापळ झाली. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी तात्काळ धाव घेत आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. देशातील तरुण आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी हा लढा अधिक तीव्र केला जाईल, असा इशारा यावेळी वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. या आंदोलनामुळे मंत्रालयाच्या आजूबाजूच्या परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. एका दिवसात 94% परदेशी कर्ज फेडण्याची ताकद:पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री फडणवीसांचे विधान, मोदींच्या 12 वर्षांच्या कारकिर्दीचे आकडेवारीसह केले समर्थन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग 12 वर्षे पंतप्रधानपद भूषवून विक्रमी टप्पा गाठल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारच्या कामगिरीचा आढावा मांडला. यावेळी त्यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेपासून ते डिजिटल व्यवहारांपर्यंत विविध क्षेत्रांतील प्रगतीची आकडेवारी सादर करत देशाची आर्थिक ताकद मोठ्या प्रमाणात वाढल्याचा दावा केला. फडणवीस म्हणाले की, भारत आज जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. जागतिक स्तरावर अनेक देश आर्थिक मंदीचा सामना करत असताना भारताचा विकासदर सात टक्क्यांहून अधिक आहे. जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून भारताकडे पाहिले जात आहे. सविस्तर वाचा

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp