एडीसीसी बँकेच्या विशेष सभेला न्यायालयाचा ब्रेक: शेअर मूल्यवाढीच्या निर्णयावर चर्चा करण्यास मनाई, पुढील सुनावणी 1 जुलैला – Amravati News

एडीसीसी बँकेच्या विशेष सभेला न्यायालयाचा ब्रेक:  शेअर मूल्यवाढीच्या निर्णयावर चर्चा करण्यास मनाई, पुढील सुनावणी 1 जुलैला – Amravati News



अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची (एडीसीसी) २१ जून रोजी होणारी विशेष सभा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशामुळे रद्द करण्यात आली आहे. बँकेचे संचालक रवींद्र गायगोले यांनी दाखल केलेल्या याचिकेवर हा निर्णय आला. या सभेत शेअरचे मूल्य वाढवण्यावर चर्चा होणार होती, ज्याला न्यायालयाने मनाई केली आहे. न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती राज वाकोडे यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला. बँकेच्या वैयक्तिक सभासद आणि इतर सहकारी संस्थांच्या शेअर्सचे मूल्य एक हजार रुपयांवरून दहा हजार रुपये करण्याच्या विषयावर कोणतीही चर्चा किंवा निर्णय घेण्यास न्यायालयाने बँकेला मनाई केली आहे. याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲड. सागर लांबट यांनी बाजू मांडली. याचिकेनुसार, बँकेने यापूर्वी ३० सप्टेंबर २०२३ रोजी शेअर मूल्य वाढवण्याचा ठराव मंजूर केला होता, परंतु तो विभागीय सहनिबंधकांनी फेटाळला होता. त्यानंतर सहकार मंत्र्यांनीही हा निर्णय कायम ठेवला होता. या निर्णयाला आव्हान देणारी याचिका न्यायालयात प्रलंबित असताना, पुन्हा त्याच विषयाचा समावेश करण्याला गायगोले यांनी आक्षेप घेतला होता. या बाबीची दखल घेत न्यायालयाने संबंधित प्रतिवादींना नोटीस बजावली असून, पुढील सुनावणी १ जुलै रोजी निश्चित केली आहे. न्यायालयाने स्पष्ट केले की, विशेष सर्वसाधारण सभा नियोजित वेळेनुसार होऊ शकते, परंतु विषयपत्रिकेतील कलम ५ (ब) नुसार क्लास-बी शेअर्सचे मूल्य वाढवण्याबाबत कोणतीही चर्चा किंवा निर्णय घेता येणार नाही. उच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे एडीसीसी बँकेतील प्रस्तावित शेअर मूल्यवाढीच्या निर्णयाला तात्पुरता ब्रेक लागला आहे. दरम्यान, बँकेनेही विशेष साधारण सभा रद्द झाल्याची सूचना दिली आहे. दी अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची विशेष साधारण सभा २१ जून रोजी दुपारी १ वाजता बँकेच्या मुख्य कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जाहिरात देऊन ही सभा रद्द झाल्याचे कळवले आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp