डिलिव्हरीच्या निमित्ताने बंद घरे हेरायचा: घरफोडीप्रकरणी ब्लिंकिट कर्मचाऱ्याला अटक – Kolhapur News

डिलिव्हरीच्या निमित्ताने बंद घरे हेरायचा:  घरफोडीप्रकरणी ब्लिंकिट कर्मचाऱ्याला अटक – Kolhapur News



सातारा शहरातील शाहूनगर परिसरातील घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लावत सातारा शहर गुन्हे प्रकटीकरण (डी.बी.) शाखेने एका संशयिताला अटक केली आहे. विशेष बाब म्हणजे अटक करण्यात आलेला आरोपी हा ऑनलाइन किराणा वितरण सेवा देणाऱ्या कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून कार्यरत असून, कामाच्या निमित्ताने परिसरात फिरताना बंद घरे हेरून चोरी करत असल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 जून रोजी शाहूनगर येथील आमराई कॉलनीतील शिवालय अपार्टमेंटमधील एका बंद फ्लॅटचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने चोरी करण्यात आले होते. या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर डी.बी. पथकाने तपासाची सूत्रे हाती घेतली. तांत्रिक माहिती, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयिताचा माग काढला. दोन दिवसांच्या शोधमोहीमेनंतर पहाटेच्या सुमारास चारचाकी वाहनातून जात असताना त्याला अडविण्यात आले. सुरुवातीला पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयिताला पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले. न्यायालयाने पोलीस कोठडी मंजूर केल्यानंतर झालेल्या चौकशीत आरोपीने घरफोडीची कबुली दिली. ओंकार नरेश बाबर (वय 30, रा. दिव्यनगरी, शाहूपुरी, सातारा; मूळ गाव उडतारे, ता. वाई) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीकडून चोरीतील सोन्याचे दागिने, गुन्ह्यात वापरलेले वाहन आणि मोबाईल फोन असा एकूण 13 लाख 1 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली. या कारवाईमुळे शहरातील घरफोडीचा गुन्हा उघडकीस आला असून, घर बंद ठेवताना नागरिकांनी अधिक सतर्कता बाळगावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp