वाहनचालकांनो सावधान!: HSRP नंबर प्लेट नसल्यास थेट दंड; नागपुरात 158 वाहनांवर कारवाई, आता राज्यभर धडक मोहीम – Maharashtra News

वाहनचालकांनो सावधान!:  HSRP नंबर प्लेट नसल्यास थेट दंड; नागपुरात 158 वाहनांवर कारवाई, आता राज्यभर धडक मोहीम – Maharashtra News



वाहनांच्या सुरक्षिततेसाठी राज्यभरात ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट’ (HSRP) अनिवार्य करण्यात आली आहे. मात्र, या नियमाकडे वारंवार पाठ फिरवणाऱ्या वाहनचालकांवर आता नागपूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (RTO) बडगा उगारला आहे. नागपूर जिल्ह्यात एचएसआरपी प्लेट नसलेल्या तब्बल १५८ वाहनांवर आरटीओच्या भरारी पथकाने धडक कारवाई केली असून, त्यांच्याकडून लाखोंचा दंड वसूल करण्यात आला आहे. प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड आरटीओच्या भरारी पथकाने नागपूर शहरातील विविध मार्गांवर अचानक वाहनांची तपासणी केली. या तपासणीदरम्यान ज्या वाहनांवर एचएसआरपी प्लेट नव्हती, अशा १५८ वाहनांवर कारवाई करण्यात आली. नियम मोडणाऱ्या प्रत्येक वाहनधारकाकडून १ हजार रुपये दंड आकारण्यात आला असून, या कारवाईतून एकूण १ लाख ५८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ‘या’ वाहनधारकांना कारवाईतून सवलत ज्या वाहनधारकांनी आपल्या वाहनांवर एचएसआरपी प्लेट बसवण्यासाठी ३० जूनपर्यंत ऑनलाईन अपॉइंटमेंट घेतली आहे आणि ज्यांच्याकडे तशी पावती उपलब्ध आहे, अशा वाहनधारकांना या कारवाईतून तात्पुरती सवलत देण्यात आली आहे. मात्र, ज्यांनी अद्याप नोंदणीच केलेली नाही, त्यांच्यावर थेट दंडात्मक कारवाई केली जात आहे. आजपासून मोहीम आणखी तीव्र होणार आरटीओ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, एचएसआरपी प्लेट संदर्भात वाहनधारकांना वारंवार सूचना देऊनही अनेक जण त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे आजपासून संपूर्ण नागपूर जिल्ह्यात तपासणी मोहीम आणि दंडात्मक कारवाई अधिक वेगाने आणि कडक स्वरूपात राबविली जाणार आहे. त्यामुळे वाहनधारकांनी लवकरात लवकर एचएसआरपी प्लेट बसवून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. हे ही वाचा.. राज्यात पावसाचा हाहाकार:रायगड-पालघरमधील शाळांना सुट्टी; पुढील 8 तासांसाठी रेड अलर्ट, मुंबईत लोकल वाहतूक खोळंबली महाराष्ट्रभरात मान्सूनने रौद्ररूप धारण केले असून मुंबई, ठाणे आणि कोकणासह अनेक जिल्ह्यांमध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील ८ तासांत पावसाचा जोर आणखी वाढण्याचा इशारा दिला असून नागरिकांना अत्यंत महत्त्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. या गंभीर पार्श्वभूमीवर प्रशासनाने हायअलर्ट जारी केला आहे. शाळांना सुट्टी जाहीर मुसळधार पावसाचा धोका ओळखून पालघर आणि रायगड जिल्ह्यातील शाळांना जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टी जाहीर केली आहे. रायगडमधील सर्वाधिक फटका बसलेल्या ७ तालुक्यांमध्ये शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सविस्तर वाचा

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp