
मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाने हाहाकार माजवला आहे. वादळी वारे आणि ढगफुटीसदृश पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडणे, दरडी कोसळणे, सखल भागात पाणी साचणे आणि वाहतूक ठप्प होण्याच्या गंभीर घटना घडल्या आहेत. या आपत्कालीन परिस्थितीवरून विरोधकांनी सत्ताधारी भाजप आणि प्रशासनाला धारेवर धरले असतानाच, भाजपचे ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर यांनी विरोधकांचे आरोप फेटाळत सरकारची आणि मुंबई महानगरपालिकेची पाठराखण केली आहे. माध्यमांशी बोलताना आमदार कालिदास कोळंबकर यांनी मुंबईतील सद्यस्थितीवर आपले मत मांडले. ते म्हणाले, “सध्या मुंबईत अत्यंत तीव्र स्वरूपाचा पाऊस पडत आहे. मी माझ्या दीर्घ राजकीय प्रवासात इतक्या वर्षांत असा पाऊस कधीही पाहिलेला नाही. यंदा ज्या प्रमाणात मोठ्या संख्येने झाडे कोसळण्याच्या दुर्घटना घडल्या आणि त्यात काहींचा दुर्दैवी जीव गेला, ते खरोखरच चिंताजनक आहे.” “मुंबई पालिका प्रशासनाने या संकटामधून आणि अनपेक्षित घटनांमधून काही गोष्टी शिकल्या पाहिजेत. भविष्यात अशा नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी आणि निष्पाप नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी आतापासूनच ठोस उपाययोजनांचा विचार करायला हवा.” मी आधी नगरसेवक होतो, मला सारं माहितीये! भाजपवर होणाऱ्या टीकेचा समाचार घेताना कोळंबकर यांनी जुन्या सत्ताधाऱ्यांची आठवण करून दिली. “या परिस्थितीसाठी भाजपला जबाबदार धरणे चुकीचे आहे. महापालिकेत आधी जे सत्ताधारी होते, त्यांनी काय कामे केली आणि कशी केली? हे मला चांगलेच माहिती आहे; कारण मी स्वतः आधी नगरसेवक म्हणून काम केले आहे. त्यामुळे आज केवळ दुसऱ्यांवर दोषारोप करणे योग्य नाही. सद्यस्थितीत राजकारण बाजूला ठेवून आलेल्या संकटाचा एकत्रित सामना करणे, हाच एकमेव पर्याय आपल्यासमोर आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. केवळ प्रशासन नाही, आमचीही जबाबदार – शिंदेंचे आमदार दुसरीकडे, मुंबईत ज्या काही घटना घडत आहेत. याबाबत नुसते प्रशासनाला जबाबदार धरता येणार नाही. आमचीही जबाबदारी आहे, असे मत शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे यांनी व्यक्त केले. जी कामे पावसाळ्यापूर्वीची वेळेत होणे अपेक्षित होते, ती न झाल्यामुळे काही घटना घडल्या आहेत. आयुक्तांनीही खालील अधिकारी यांच्यात पकड निर्माण करणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. हे ही वाचा… महाराष्ट्रात पावसाचे थैमान:आज दुपारनंतर ताशी 70 ते 90 किमी वेगाने वारे वाहणार, घराबाहेर पडणे टाळावे, CM देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आज विधानसभेचे कामकाज तातडीने स्थगित करण्यात आले आहे. हवामानाच्या अत्यंत गंभीर आणि रौद्र परिस्थितीची दखल घेत हा निर्णय घेण्यात आला. सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर मुंबईतील विविध दुर्घटनांवरून विरोधक आक्रमक झाले होते. विरोधकांच्या भूमिकेवर बोलताना राजकीय आकडेवारीपेक्षा संवेदनशीलता महत्त्वाची असल्याचे उद्या पूर्ण निवेदन देणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. याचबरोबर “आज दुपारनंतर वाऱ्याचा वेग प्रचंड वाढणार असून ताशी ७० ते ९० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये,” असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केले आहे. सविस्तर वाचा… मावळच्या पाटण गावात घरावर कोसळली दरड:संपूर्ण कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकले, एकाचा मृतदेह सापडला; शोधमोहीम सुरू पुणे जिल्ह्याला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले असून, सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे आता दुर्घटनांचे सत्र सुरू झाले आहे. आज (६ जुलै) पहाटेच्या सुमारास मावळ तालुक्यातील पाटण गावात एका घरावर डोंगरकड्यावरून मोठी दरड कोसळल्याची घटना घडली आहे. या ढिगाऱ्याखाली संबंधित घरातील संपूर्ण कुटुंब अडकले आहे. बचाव पथक तपास करत असून एक मृतदेह मिळून आला आहे. सविस्तर वाचा…
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
