
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांत झालेल्या मोठ्या राजकीय घडामोडींनंतर आता नव्या चर्चांना उधाण आले आहे. ठाकरे गटातील ६ खासदार आणि आमदार सचिन अहिर यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर, आता शरद पवार यांच्या पक्षातही मोठी फूट पडण
.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी वरिष्ठ पातळीवर काही राजकीय भेटीगाठी घेतल्याचे समजते. दिल्लीत माध्यमांशी बोलताना त्यांनी महाराष्ट्रातील आगामी राजकीय समीकरणांवर महत्त्वाची भूमिका मांडली. ते म्हणाले, “सध्या महाराष्ट्रातून एनडीएत कोणताही नवा पक्ष येणार नाही. आम्ही आमच्यासोबत आता कोणालाही जोडणार नाही,” असे मुख्यमंत्र्यांनी ठामपणे सांगितले.
शरद पवार यांच्या पक्षातील संभाव्य फुटीच्या चर्चा फेटाळून लावताना ते म्हणाले, “पवार यांचे आमदार किंवा खासदारही भविष्यात आम्ही फोडणार नाही.” यामुळे महायुती सध्या अंतर्गत बदलांच्या मूडमध्ये नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
आम्ही एनडीएला पाठिंबा देणार नाही – आमदार रोहित पवार
दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून राजकीय वर्तुळात शरद पवार यांचा पक्ष थेट एनडीएत सहभागी होणार किंवा एनडीए सरकारला बाहेरून पाठिंबा देणार, अशा दोन प्रकारच्या शक्यता वर्तवल्या जात होत्या. या सर्व वावड्यांवर शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे. “आम्ही एनडीएला कोणत्याही प्रकारचा पाठिंबा देणार नाही,” असे सांगत रोहित पवारांनी या चर्चा केवळ संभ्रम निर्माण करण्यासाठी सुरू असल्याचा आरोप केला.
काही दिवसांपूर्वी होती विलीनीकरणाची चर्चा
अजित पवार हयात असताना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. जर शरद पवार आणि अजित पवार यांचे पक्ष एकत्र आले असते, तर ते ‘एनडीए’सोबत राहणार की ‘इंडिया’ आघाडीसोबत? हा प्रश्न अजित दादांच्या अपघाती निधनामुळे कायमचा अनुत्तरित राहिला. मात्र, आता दादांच्या पश्चात जयंत पाटील आणि विनोद तावडे यांच्यात झालेल्या या ताज्या आणि महत्त्वाच्या बैठकीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला कोणती नवीन दिशा मिळते आणि शरद पवार गट काय अंतिम निर्णय घेतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
भविष्यातील घडामोडींकडे राज्याचे लक्ष
ठाकरे गटाला लागलेल्या मोठ्या गळतीनंतर विरोधकांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. त्यातच शरद पवार यांच्या पक्षाबाबत थेट मुख्यमंत्र्यांनीच दिल्लीतून भूमिका स्पष्ट केल्यामुळे या चर्चांना तूर्तास पूर्णविराम मिळाला आहे. मात्र, ‘कधी काय होईल हे सांगता येत नाही’ अशी स्थिती असलेल्या महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात नेमके काय घडणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
हे ही वाचा…
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंपाचे संकेत!:जयंत पाटील अन् विनोद तावडे यांची मुंबईत भेट, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची नवीन चाचपणी?
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे काही खासदार आणि आमदार सत्तेत नसल्यामुळे मतदारसंघातील विकासकामांसाठी थेट ‘एनडीए’मध्ये जाण्यास उत्सुक असल्याच्या चर्चांनी सध्या राजकीय वर्तुळ ढवळून निघाले आहे. याच पार्श्वभूमीवर, मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यात बैठक पार पडल्याची माहिती समोर आली आहे. या नव्या घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला पुन्हा एकदा कलाटणी मिळण्याचे संकेत असून, ठाकरे गटाला एकाकी पाडण्याची ही शरद पवारांची नवी खेळी असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. सविस्तर वाचा…
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
