जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांची पूजा: आळंदीत ‘माऊली, माऊली’च्या गजरात भक्तिमय वातावरण – Pune News

जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांची पूजा:  आळंदीत ‘माऊली, माऊली’च्या गजरात भक्तिमय वातावरण – Pune News



आळंदी येथील संत श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या संजीवन समाधी मंदिरात ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांची जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या उपस्थितीत विधीवत पूजा करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी पादुकांचे दर्शन घेतले. या पूजेवेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे उपस्थित होते. संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, विश्वस्त योगी निरंजननाथ गुरु शांतीनाथ, पालखी सोहळा प्रमुख तथा विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप, विश्वस्त चैतन्य लोंढे, डॉ. रोहिणी पवार आणि पुरुषोत्तम पाटील यांचीही उपस्थिती होती. आळंदी मंदिर परिसरात सध्या भक्तिमय वातावरण आहे. टाळ-मृदुंगाच्या तालावर वारकरी भक्तिरसात चिंब झाले आहेत. ‘ज्ञानोबा माऊली’, ‘माऊली, माऊली’ च्या गजराने परिसर दुमदुमून गेला आहे. डोक्यावर तुळशी वृंदावन आणि हाती दिंड्या-पताका घेतलेले वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे उद्या पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. आळंदी परिसरात येणाऱ्या भाविकांसाठी विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये सार्वजनिक आरोग्य सुविधा, निवारा, शौचालय, पिण्याचे पाणी, हिरकणी कक्ष, महिला स्नानगृह आणि मोबाईल चार्जिंग स्टेशनचा समावेश आहे. तसेच, चौकाचौकात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, स्वच्छता पथके आणि भाविकांना सूचना देण्यासाठी ध्वनिक्षेपण यंत्रणा व अग्निशमन यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. या व्यवस्थेला भाविकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. ‘सेवा वारी’ उपक्रमांतर्गत पालखी सोहळ्यासाठी पुणे महानगरपालिका सज्ज; वारकऱ्यांच्या सोयी-सुविधांमध्ये मोठी वाढ संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा गुरुवार, ९ जुलै २०२६ रोजी पुणे शहरात दाखल होणार असून वारकरी भाविकांच्या स्वागतासाठी व सेवेसाठी पुणे महानगरपालिकेने ‘सेवा वारी’ हा विशेष उपक्रम हाती घेतला आहे.महापालिका आयुक्त नवल किशोर राम, .अतिरिक्त आयुक्त प्रजीत नायर, ओमप्रकाश दिवटे, पालखी नोडल अधिकारी निखिल मोरे आणि उपायुक्त माधव जगताप यांनी पालखीच्या अंतिम मुक्कामस्थळांची पाहणी करून सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती दिली आहे. यंदा संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखीच्या मुक्कामस्थळी उपलब्ध जागा पाचपट वाढवून ५ हजार चौ. फूट करण्यात आली आहे. या विस्तारित जागेत महिला व पुरुष वारकऱ्यांसाठी स्वतंत्र व सुसज्ज व्यवस्था करण्यात आली आहे. पालखी सोहळ्याच्या इतिहासात प्रथमच विशेष जर्मन हँगर उभारण्यात आला असून, लांबचा प्रवास करून आलेल्या वारकऱ्यांना फिजिओथेरपीच्या विद्यार्थ्यांमार्फत मोफत फिजिओथेरपी व मालिश सेवा देण्यात येणार आहे. शहरातील विविध ठिकाणी वारकऱ्यांच्या सोयीसाठी १९५ वॉटरप्रूफ मांडव उभारण्यात आले आहेत. या मांडवांमधून पुणे महानगरपालिका व स्थानिक नागरिकांच्या सहभागातून आवश्यक साहित्य व इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp