हिंगोलीत भूकंपाच्या धक्क्यांची मालिका: भूकंपरोधक बांधकाम व सुरक्षिततेसंदर्भात सीबीआरआयचे जिल्ह्यात विशेष प्रशिक्षण आयोजित करणार – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता – Hingoli News

हिंगोलीत भूकंपाच्या धक्क्यांची मालिका:  भूकंपरोधक बांधकाम व सुरक्षिततेसंदर्भात सीबीआरआयचे जिल्ह्यात विशेष प्रशिक्षण आयोजित करणार – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता – Hingoli News

हिंगोली जिल्ह्यात वारंवार जाणवणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांच्या पार्श्वभूमीवर भूकंप आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने प्रभावी उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आज (दि. 13) जिल्हाधिकारी कार्यालयात मध्यवर्ती इमारत संशोधन स

.

या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, सीबीआरआयचे संचालक प्रा. प्रदीप कुमार रामचंद्र, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठातील भूगर्भशास्त्र विभागाचे प्राध्यापक व भूकंपतज्ञ डॉ. टी. विजय कुमार, अजय चौरसिया तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीच्या प्रारंभी सीबीआरआयच्या संचालकांनी इमारतींचे भूकंपरोधक मजबुतीकरण, जुन्या इमारतींचे संरचनात्मक बळकटीकरण (रेट्रोफिटिंग) तसेच भूकंपसुरक्षित बांधकाम याविषयी सादरीकरण करून आवश्यक तांत्रिक माहिती दिली.

यावेळी जिल्हाधिकारी गुप्ता यांनी भूकंप आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने विविध विभागांना महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. सीबीआरआयच्या तज्ज्ञांचे पथक हिंगोली जिल्ह्यात भेट देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करून त्यांचे विशेष दौरे आयोजित करावेत. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत अधिकारी, अभियंते आणि संबंधित यंत्रणांसाठी भूकंपसुरक्षित इमारत बांधकाम व सुरक्षिततेबाबत विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करावा, असे निर्देश त्यांनी दिले.

याशिवाय सीबीआरआयच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच अन्य शासकीय इमारतींच्या रेट्रोफिटिंगसाठी आवश्यक अंदाजपत्रके तयार करण्याची कार्यवाही तातडीने सुरू करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी गुप्ता यांनी संबंधित विभागांना दिल्या.

हे ही वाचा…

मुलीची टीसी मागण्यासाठी गेलेल्या पालकास मारहाण:संस्थाध्यक्षासह तिघांवर गुन्हा दाखल, कोळसा येथील बी फार्मसी कॉलेजमधील प्रकार

सेनगाव तालु्क्यातील कोळसा येथे बी फार्मसी महाविद्यालयात मुलीची टीसी मागण्यासाठी गेलेल्या पालकास मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी संस्थाध्यक्षासह तिघांवर सेनगाव पोलिस ठाण्यात सोमवारी ता. १३ गुन्हा दाखल झाला आहे. सविस्तर वाचा…

हिंगोलीत काळाचा घाला:कयाधू नदीपात्रात बैलजोडी धुण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा पाण्यात बुडून करुण अंत

हिंगोलीत भूकंपाच्या धक्क्यांची मालिका: भूकंपरोधक बांधकाम व सुरक्षिततेसंदर्भात सीबीआरआयचे जिल्ह्यात विशेष प्रशिक्षण आयोजित करणार - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता - Hingoli News

हिंगोली तालु्क्यातील घोटा शिवारात कयाधू नदीच्या पात्रात बैलजोडी धुण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा पाण्यात बुडून करुण अंत झाल्याची घटना रविवारी ता. 12 रात्री उघडकीस आली आहे. दोघांवर शोकाकुल वातावरणात घोटा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. या घटनेमुळे घोटा गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेची नर्सी नामदेव पोलिस ठाण्यात नोंद झाली नाही. सविस्तर वाचा…

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)