चिखलदऱ्याला दररोज बससेवा द्यावी, हनी व्हिलेजवासीयांची मागणी: महाबळेश्वरप्रमाणे पर्यटन वाढीसाठी परिवहन मंत्र्यांसह पालकमंत्र्यांना निवेदन – Amravati News

चिखलदऱ्याला दररोज बससेवा द्यावी, हनी व्हिलेजवासीयांची मागणी:  महाबळेश्वरप्रमाणे पर्यटन वाढीसाठी परिवहन मंत्र्यांसह पालकमंत्र्यांना निवेदन – Amravati News



विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखलदरा पर्यटन स्थळासाठी दररोज बससेवा सुरू करावी, अशी मागणी चिखलदराजवळील आमझरी येथील ‘हनी व्हिलेज’च्या रहिवाशांनी केली आहे. महाबळेश्वरच्या धर्तीवर पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी ही सेवा आवश्यक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. यामुळे चिखलदऱ्यासोबतच आमझरीचे मधही सर्वदूर पोहोचण्यास मदत होईल. आमझरी येथील रहिवाशांच्या वतीने सुनील भालेराव यांनी राज्याचे महसूल मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन सादर केले. या निवेदनाच्या प्रती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि अमरावतीचे विभागीय नियंत्रक यांनाही पाठवण्यात आल्या आहेत. निवेदनात नमूद केले आहे की, अमरावती येथून चिखलदऱ्यासाठी असलेली थेट बससेवा गेल्या पाच वर्षांपासून पूर्णपणे बंद आहे. सध्या केवळ यवतमाळ येथून सायंकाळी ५.३० वाजता सुटणाऱ्या एकाच बसवर पर्यटक आणि स्थानिक आदिवासी नागरिकांना अवलंबून राहावे लागते. याशिवाय, विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेली ‘मानव विकास मिशन’ची परतवाडा-चिखलदरा बससेवा निधीअभावी बंद पडली आहे. अलीकडेच वन विभाग आणि एसटी महामंडळाच्या संयुक्त करारानुसार एक बस सुरू करण्यात आली, परंतु ती आठवड्यातून फक्त एकच दिवस धावते. त्यामुळे दररोज प्रवास करणाऱ्यांसाठी खात्रीशीर सार्वजनिक वाहतूक उपलब्ध नाही. सर्वसामान्य पर्यटकांना चिखलदऱ्याचा आनंद घेता यावा आणि स्थानिक आदिवासी व व्यावसायिकांना रोजगार मिळावा, यासाठी अमरावती ते चिखलदरा (आमझरी मार्गे) दररोज किमान दोन इलेक्ट्रिक बसेस आणि एक साधी बस तातडीने सुरू करण्याची मागणी चिखलदरावासीयांनी केली आहे. या मागणीवर पालकमंत्री आणि परिवहन विभाग काय निर्णय घेतो, याकडे विदर्भातील पर्यटकांचे लक्ष लागले आहे. सरकारी बससेवा उपलब्ध नसल्यामुळे पर्यटकांना चिखलदऱ्याला जाण्यासाठी खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. हा प्रवास खर्चिक असल्याने चिखलदऱ्यातील पर्यटन वाढीला अडथळा निर्माण होत आहे. गेल्या वर्षी खाजगी वाहनांमुळे चिखलदऱ्यात प्रचंड गर्दी झाली होती, ज्यामुळे वाहतूक व्यवस्था सांभाळताना स्थानिक प्रशासनाला अडचणी आल्या होत्या. या समस्येबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींना अनेकदा निवेदने देऊनही कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचे नागरिकांनी म्हटले आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp