
महायुतीमध्ये छोट्या गोष्टीवरुन नाराजी नाट्य होण्याचे कारण नाही. बंगले देण्याचे काम सामान्य प्रशासन विभागाचे काम असते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारीत हा विभाग काम करतो. त्यामुळे बंगल्याच्या मुद्द्यावर तोडगा काढला जाईल त्यामुळे महायुतीमध्ये मतभेद होतील अशी स्वप्ने काही लोकं बघत असतील तर त्यांना तसा अधिकार आहे, असे सचिन आहिर यांना शासकीय बंगला न मिळाल्याने ते नाराज असून ते एकनाथ शिंदेंकडे तक्रार करणार असल्याच्या चर्चेवर बोलताना भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. नवनाथ बन म्हणाले की, सुधीर मुनगंटीवार हे आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना आमच्या पक्षाची कार्यपद्धती माहिती आहे. त्यांनी स्पष्ट सांगितले आहे की भाजप एकनाथ शिंदे यांचे महत्त्व कमी करत नाही. भाजपचे 105 आमदार असताना भाजपने एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केले आणि असेच मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. सुधीरभाऊंच्या मंत्रिपदाबाबत आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय योग्य वेळी मुख्यमंत्री आणि संसदीय बोर्ड घेतील. मंत्रिपदाचा निर्णय हा मुख्यमंत्री घेतील . ठाकरेंना लगावला टोला नवनाथ बन म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी कायद्याची भाषा करू नये. कायदा काय असतो हे अमित शहा यांना माहिती आहे. कलम 370 रद्द करत कायदा कसा चालवतात, ट्रिपल तलाक करत कायद्याची अंमलबजावणी कशी केली जाते आणि बांगलादेशच्या जमीनीवर फेन्सिंग लावत कायद्याचे राज्य कसे आणायचे आहे, काश्मीरमधील दगडफेक रोखून कायदा सुवव्यस्था कशी राखायची हे अमितभाई यांनी देशाला दाखवून दिले आहे. ते देशभक्त असून कायदेशीर मार्गाने देश चालवतात. तुमच्यासारखे बेकायदेशीरपणे ते वागत नाही. राज ठाकरेंनी आपल्या गल्लीत काय गोंधळ काय सुरू आहे त्याकडे लक्ष दिनले पाहिजे, दिल्लीमधे काय सुरू आहे ते सरकार पाहून घेईल असा टोला बन यांनी लगावला आहे. ठाकरेंनी नाक घासून माफी मागावी नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना रामरक्षा आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. माझा त्यांना सवाल आहे, ज्या उद्धव ठाकरेंनी जय श्री राम हा हरामखोरपणा आहे असे म्हटले होते. त्याबद्दल उद्धव ठाकरे नाक घासून माफी मागणार असतील तर देवाभाऊ आंदोलनामध्ये सहभागी होतील. ज्या काँग्रेसने प्रभु श्री रामांचे अस्तित्व नाकारले त्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे यांनी राजकारण केले त्याबद्दल जर ठाकरे आणि राऊत नाक घासत माफी मागणार असतील तर देवाभाऊ रामरक्षा आंदोलनात सहभागी होतील. उबाठाचे हे आंदोलन पक्षरक्षेसाठी आहे. राऊतांची भूमिका गांडूळासारखी नवनाथ बन म्हणाले की, प्रभु रामचंद्र यांचा राऊतांनी कायम अपमान केला आहे. काँग्रेसने सांगितले म्हणून प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याला उद्धव ठाकरे गेले नाहीत. उद्धव ठाकरेंना त्यावेळी लाज वाटली नाही का? राम मंदिर आंदोलनावेळी ठाकरे-राऊत कुठे होते असे म्हणत तुम्ही त्यावेळी कुठेही नव्हते, तुम्ही नौटंकी करत आहात. राऊतांच्या हाती चाव्या दिल्यावर काय होते हे महाराष्ट्राने पाहिले आहे. पत्राचाळीच्या चाव्या संजय राऊतांकडे दिल्या तिथे करोडो रुपयांचा घोटाळा केला. कोरोना काळात महाराष्ट्र तुमच्या हाती दिला त्यावेळी खिचडी, कफनचोरी केली. तुमच्या हाती चाव्या दिल्यावर तुम्ही महाराष्ट्र कसा लुटला हे सर्वांना माहिती आहे. तुमचे हिंदुत्व नाही, ते कधीच संपले आहे. गांडूळासारखी राऊतांची भूमिका आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
