
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या रोज नव्या चर्चा आणि अनपेक्षित घडामोडी पाहायला मिळत आहेत. अशातच आता आमदार रवी राणा यांनी एक अत्यंत खळबळजनक दावा केला आहे. “येत्या १५ दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट (शरद पवार गट आणि अजित पवार गट) एकत्र येतील, असा मोठा दावा रवी राणा यांनी केला आहे. एवढेच नाही, तर खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राजकीय जबाबदाऱ्यांबद्दलही त्यांनी मोठी भविष्यवाणी केली आहे. ‘राजकारणात अशक्य ते शक्य होते!’ राज्यातील राजकीय स्थितीवर भाष्य करताना आमदार रवी राणा यांनी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर ठाम दावा केला. ते म्हणाले, “राजकारणात जे अशक्य वाटते, ते नेहमीच शक्य झालेले आपण पाहिले आहे. त्यामुळे येणाऱ्या १५ दिवसांमध्ये सुनेत्रा पवार आणि शरदचंद्र पवार साहेब यांचे दोन्ही पक्ष (गट) एकत्र येतील, हे चित्र तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल.” लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा दबक्या आवाजात सुरू असतानाच, राणा यांच्या या थेट दाव्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत. सुप्रिया सुळे केंद्रात, तर सुनेत्रा पवार राज्यात? राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आल्यास सत्तेचे आणि नेतृत्वाचे वाटप कसे असेल, याचेही भाकीत राणा यांनी वर्तवले आहे. राणा म्हणाले, “दिल्लीतील राजकारण सुप्रियाताई सुळे पाहतील आणि राज्याचे नेतृत्व सुनेत्राताई पवार करतील. पुढची भविष्यवाणी सुद्धा मी सांगतो… केंद्रामध्ये सुप्रियाताई मंत्री बनतील आणि संपूर्ण राज्य सांभाळण्याची मोठी जबाबदारी सुनेत्राताई पवार यांच्याकडे राहील.” शिंदे आणि ठाकरेही एकत्र येणार? केवळ राष्ट्रवादी काँग्रेसपुरतेच न थांबता, आमदार रवी राणा यांनी शिवसेनेबाबतही मोठा आणि दावा केला. “येणाऱ्या काळामध्ये आपल्याला हे सुद्धा चित्र दिसेल की उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे एकत्र आलेले असतील,” असे राणा म्हणाले. राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आमदार रवी राणा यांच्या या खळबळजनक दाव्यांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. सुप्रिया सुळे केंद्रात आणि सुनेत्रा पवार राज्यात महत्त्वाची भूमिका बजावतील, या राणा यांच्या विधानाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. आता खरोखरच येत्या १५ दिवसांत राणा यांच्या दाव्यानुसार दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? आणि शिंदे-ठाकरे यांच्यात मनोमिलन होणार का? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. हेही वाचा.. ‘हिंदूंच्या श्रद्धेला तडा गेलाय, त्यांना ऊर्जा देण्याची गरज’: मोहन भागवतांना रामरक्षा आंदोनाचे निमंत्रण देत राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात अयोध्येतील राम मंदिरात झालेल्या कथित गैरव्यवहार आणि लुटीच्या विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने ‘रामरक्षा’ ही राज्यव्यापी चळवळ उभी केली आहे. या उपक्रमांतर्गत १८ जुलै २०२६ रोजी नागपुरात उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमाचे निमंत्रण खासदार संजय राऊत यांनी काल (१५ जुलै) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे दिले होते. त्यानंतर आता राऊत यांनी थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनाही पत्र लिहून या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे ‘विशेष निमंत्रण’ दिले आहे. या पत्रातून राऊतांनी राम मंदिरातील चोरीवरून भाजप आणि प्रशासनावर सडकून टीका केली असून, संघालाही सूचक टोला लगावला आहे. सविस्तर वाचा..
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
