पैठणमध्ये स्वाभिमानीचे शोले स्टाईल आंदोलन: साखर कारखान्याच्या 19 कोटी 50 लाखांच्या एफआरपीसाठी टाकीवर चढून आंदोलन – Chhatrapati Sambhajinagar News

पैठणमध्ये स्वाभिमानीचे शोले स्टाईल आंदोलन:  साखर कारखान्याच्या 19 कोटी 50 लाखांच्या एफआरपीसाठी टाकीवर चढून आंदोलन – Chhatrapati Sambhajinagar News



संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याने 2025-26 च्या हंगामातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची तब्बल 19 कोटी 50 लाख रुपयांची एफआरपी (FRP) थकविल्याच्या निषेधार्थ आज पैठणमध्ये जोरदार आंदोलन करण्यात आले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊली मुळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी थेट तहसील कार्यालय परिसरातील पाण्याच्या टाकीवर चढून ‘शोले’ स्टाईलने आंदोलन सुरू केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कारखान्याने ऊस बिलांची मोठी रक्कम थकविल्यामुळे तालुक्यातील शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सापडले आहेत. या प्रकरणी महसूल विभागाने कारखान्याची जप्ती व लिलाव प्रक्रिया सुरू केली होती. मात्र, लिलावाच्या प्रक्रियेत अनेक त्रुटी ठेवण्यात आल्याने 3 जुलै 2026 रोजीचा लिलाव स्थगित करावा लागला. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे जप्ती आणि लिलावाची प्रक्रिया वारंवार लांबणीवर पडत असून, शेतकऱ्यांना हक्काच्या पैशांसाठी वाट पाहावी लागत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी पाण्याच्या टाकीवर चढण्यापूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर तब्बल दोन तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात जप्त मालमत्तेचे पंचनामे, मूल्यांकन आणि ई-लिलावाची प्रक्रिया तात्काळ पूर्ण करून शेतकऱ्यांचे देयक लवकरात लवकर अदा करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच, यापूर्वी झालेल्या कथित चुकीच्या लिलाव प्रक्रियेची सखोल चौकशी करून संबंधित दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची आक्रमक मागणीही संघटनेने केली आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp