ईश्वरपूरचे नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांना दिलासा: पद रद्द करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशला स्थगिती, नगरविकास विभागाचा निर्णय – Solapur News

ईश्वरपूरचे नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांना दिलासा:  पद रद्द करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशला स्थगिती, नगरविकास विभागाचा निर्णय – Solapur News



ईश्वरपूरचे नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांच्यावरील अपात्रतेच्या कारवाईला नगरविकास विभागाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे पुढील सुनावणी होईपर्यंत त्यांचे नगराध्यक्षपद कायम राहणार आहे. काही दिवसांपूर्वी सांगली जिल्हाधिकाऱ्यांनी बांधकाम अनियमिततेच्या आरोपांवरून त्यांना अपात्र ठरवले होते. मात्र नगरविकास विभागाच्या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला दिलासा मिळाला आहे. सांगलीचे जिल्हाधिकारी मैनाक घोष यांनी कथित बांधकाम अनियमिततेच्या प्रकरणात आनंदराव मलगुंडे यांचे नगराध्यक्षपद रद्द करण्याचे आदेश दिले होते. त्याचबरोबर त्यांचे बंधू आणि नगरसेवक सुनील मलगुंडे यांनाही अपात्र घोषित करण्यात आले होते. मात्र, या निर्णयाविरोधात दाखल करण्यात आलेल्या अपीलवर सुनावणी करत नगरविकास विभागाने अपात्रतेच्या आदेशाला अंतरिम स्थगिती दिली आहे. त्यामुळे अंतिम निर्णय होईपर्यंत दोघांनाही दिलासा मिळाला आहे. काय आहे नेमके प्रकरण? आनंदराव मलगुंडे आणि त्यांचे बंधू सुनील मलगुंडे यांच्या संयुक्त मालकीची पेठ-सांगली रोडवर, बसस्थानकाजवळ एक लॉजिंग आणि शॉपिंग सेंटरची मोठी इमारत आहे. ही इमारत थेट पेठ-सांगली राज्य महामार्गाला खेटून उभी करण्यात आली आहे. मलगुंडे यांनी भूमापन क्रमांक ८/१अ, ८/१अ/१२, ८/१अ/१३, ८/१ब आणि ८/२ या मिळकतीमध्ये अतिक्रमण करून हे बांधकाम केल्याचे सिद्ध झाले आहे. आनंदराव मलगुंडे हे गेली अनेक वर्षे नगरपालिकेत नगरसेवक आणि नगराध्यक्ष या महत्त्वाच्या पदांवर आहेत. त्यांनी आपल्या याच पदाचा आणि अधिकारांचा गैरवापर करून हे अनधिकृत बांधकाम केल्याचा थेट आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. माहिती अधिकार ते थेट अपात्रता… या संपूर्ण बेकायदेशीर बांधकामाला शिवसेनेचे नेते घनश्याम ऊर्फ जयकुमार जाधव यांनी आव्हान दिले होते. धव यांनी सुरुवातीला माहिती अधिकारांतर्गत (RTI) या इमारतीच्या बांधकाम परवानगीची आणि नियमितीकरणाची सर्व कागदपत्रे व माहिती मिळवली. ही माहिती गोळा केल्यानंतर त्यांनी थेट सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे याचिका दाखल करत आनंदराव मलगुंडे यांचे नगराध्यक्षपद रद्द करण्याची मागणी केली होती. सुनावणीनंतर जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई जिल्हाधिकाऱ्यांसमोर झालेली तक्रारीची सुनावणी आणि उपलब्ध कागदपत्रांचा आढावा घेतल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आनंदराव मलगुंडे यांचे नगराध्यक्षपद आणि सुनील मलगुंडे यांचे नगरसेवकपद रद्द करण्याचा निर्णय दिला होता. या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. आता नगरविकास विभागाने या आदेशाच्या अंमलबजावणीला स्थगिती दिल्यामुळे मलगुंडे बंधूंना मोठा दिलासा मिळाला आहे. अंतिम सुनावणीमध्ये या प्रकरणावर पुढील निर्णय होणार असून, त्याकडे स्थानिक राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. जयंत पाटील यांच्या भेटीची चर्चा या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहितीही समोर आली आहे. या भेटीची अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नसली, तरी राजकीय वर्तुळात या घडामोडीची चर्चा सुरू आहे. हे ही वाचा… विलास घुले हत्या प्रकरण:मराठा नसल्यामुळे न्याय मिळत नाही का? गुणरत्न सदावर्तेंचा सवाल, सुप्रिया सुळेंवरही साधला निशाणा बीड जिल्ह्यातील विलास घुले हत्या प्रकरणावरून ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी राज्य सरकार, पोलिस प्रशासन आणि महाविकास आघाडीतील काही नेत्यांवर जोरदार टीका केली. या प्रकरणातील मुख्य आरोपींवर कारवाई होत नसल्याचा आरोप केला. आम्ही मराठा नाही म्हणून न्याय मिळत नाही का? असा सवाल उपस्थित करत, त्यांनी संपूर्ण प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करण्याची मागणी केली. यावेळी मृत विलास घुले यांच्या आई आशाबाई घुले याही उपस्थित होत्या. सविस्तर वाचा…

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

https://doonitednews.in/advertisement-rate-card/

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »