उदय सामंतांची मोठी घोषणा: 100 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी 18 कोटींचा निधी – Pune News

उदय सामंतांची मोठी घोषणा:  100 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी 18 कोटींचा निधी – Pune News



पुणे येथे होणाऱ्या 100 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी मराठी भाषा विभागामार्फत 18 कोटी रुपये देण्यात येणार आहेत. मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी ही घोषणा केली. पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात हे संमेलन होणार आहे. सामंत यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यालयाला भेट दिल्यानंतर पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या निधीमध्ये विविध संमेलनांसाठी तरतूद करण्यात आली आहे. यावर्षीच्या साहित्य संमेलनासाठी 3 कोटी रुपये, तर 12 देशांमधील साहित्य संमेलनांसाठी 2 कोटी रुपये दिले जातील. यंदापासून सुरू होणाऱ्या युवा साहित्य संमेलनासाठी 13 विद्यापीठांमध्ये प्रत्येकी 25 लाख रुपये याप्रमाणे एकूण 4.5 कोटी रुपये देण्यात येणार आहेत. 99 व्या साहित्य संमेलनासाठी 5 कोटी रुपये आणि मराठी भाषा विभाग स्टॉलसाठी 50 लाख रुपये दिले जातील. मंत्री सामंत यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यालयाला भेट देऊन पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण, स्वाती माहळंक, शामकांत देवरे, राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे राजेश पांडे, सुनील महाजन आणि प्रदीप निफाडकर उपस्थित होते. भागातील साहित्यिकांनाही संमेलनात सहभागी करून घेतले पाहिजे सामंत यांनी सांगितले की, केवळ शहरातीलच नव्हे, तर ग्रामीण भागातील साहित्यिकांनाही संमेलनात सहभागी करून घेतले पाहिजे. इतर भाषांमधील दर्जेदार साहित्य मराठीत आणि मराठी साहित्य इतर भाषांमध्ये अनुवादित करण्यासाठी अनुवाद समितीला पुन्हा सक्रिय केले जाईल. राज्यातील विविध बोलीभाषांचे शब्दकोश तयार करण्याची आणि त्या पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठी भाषा सल्लागार समितीची बैठक दर सहा महिन्यांनी घेण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती सामंत यांनी दिली. निवडणुकीदरम्यान राज्यात त्रिसूत्री भाषा धोरण लागू केले जाईल, असे चुकीचे चित्र निर्माण करण्यात आले होते. मात्र, मराठी भाषा समृद्ध व्हावी आणि तिचा आग्रह कायम ठेवणे हीच वस्तुस्थिती आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी मंत्री सामंत यांच्या हस्ते साहित्य संमेलन परिषदेस मागील वर्षी जाहीर केलेला 1 कोटी रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. 100 वे साहित्य संमेलन दर्जेदार पद्धतीने घेण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

https://doonitednews.in/advertisement-rate-card/

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »