मुख्यमंत्री फडणवीस अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सवाला उपस्थित राहणार: पुण्यात 31 जुलै ते 1 ऑगस्ट दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन – Pune News

मुख्यमंत्री फडणवीस अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सवाला उपस्थित राहणार:  पुण्यात 31 जुलै ते 1 ऑगस्ट दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन – Pune News



पुणे शहर जिल्हा मातंग समाज आणि साहित्यसम्राट लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव समितीच्या वतीने डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त ३१ जुलै ते १ ऑगस्ट २०२६ या कालावधीत पुण्यात विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या मुख्य कार्यक्रमांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार उपस्थित राहणार आहेत. पुणे शहर जिल्हा मातंग समाजाचे स्वागताध्यक्ष अनिल हातागळे आणि सचिव ॲड. महेश सकट यांनी ही माहिती दिली.या वेळी पत्रकार परिषदेस शंकरभाऊ शेंडगे,प्रकाश वैराळ,रवी पाटोळे,रवी आरडे,जनार्दन वाघमारे ,दिपक कसबे ,सचिन जोगदंड,दत्ता जाधव यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते . महोत्सवाचा मुख्य प्रबोधन सोहळा दरवर्षीप्रमाणे साजरा केला जातो. ३१ जुलै २०२६ रोजी सायंकाळी गुणवंत विद्यार्थी सत्कार आणि समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या समारंभास प्र. कुलगुरू पराग काळकर, पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते आणि विवेक वेलणकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. शनिवार, १ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता साहित्यसम्राट लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे पुतळा, सारसबाग, पुणे येथे मुख्य कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे असतील, तर अनिल हातागळे स्वागताध्यक्ष म्हणून उपस्थित राहतील. प्रा. सुहास नाईक, प्रा. धनंजय झोंबाडे आणि विश्वजित मोरे प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करतील. या सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्यातील अनेक मंत्री, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, विविध पक्षांचे पदाधिकारी आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांचा प्रसार, सामाजिक समता, शिक्षण आणि समाजप्रबोधनाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पुरस्कार समारंभही आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये साहित्यसम्राट लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे समाजभूषण पुरस्कार माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे आणि विधान परिषद सदस्य अमित गोरखे यांना प्रदान करण्यात येणार आहे. तसेच, वीर लढवय्या फकिरा पुरस्कार दुर्गेश महादेव हातागळे आणि दिगंबर जोगदंड यांना, तर सत्यशोधक मुक्ता साळवे पुरस्कार कु. कोमल एकनाथ शिंदे यांना देण्यात येणार आहे. पुणे शहर आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

https://doonitednews.in/advertisement-rate-card/

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »