
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी महाराष्ट्रातील सध्याच्या एकंदरीत परिस्थितीवर भाष्य करताना संताप व्यक्त केला आहे. काय ऑपरेशन टायगर लावले आहे? लाजा नाही वाटत? उघडपणे तुमच्या तोंडावर लोक मरतायत आणि आपण पैसे देऊन आमदार, खासदार, नगरसेवक फोडतोय. निर्लज्जपणे सगळं सुरू आहे, अशा शब्दांत अमित ठाकरे यांनी टीका केली आहे. अमित ठाकरे म्हणाले, भीषण परिस्थिती चालू आहे आपल्या राज्यात. मला अशा ठिकाणी आल्यावर काय बोलायचे कळत नाही. महानगरपालिकेमुळे शॉक लागून दोन मुली बिचाऱ्या हॉस्पिटल बेडवर आहेत. मुंबईमध्ये झाडे कोसळून लोक मरत आहेत. पॉट होलमध्ये जाऊन लोक मरतायत. तो भाजपचा साटम, लोकांच्या मृत्यूवर हसतोय हा माणूस. एक माणूस लोकांच्या मृत्यूवर हसतोय यापेक्षा घाण काय असू शकते? असा संतप्त सवाल अमित ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. सगळ्यात जास्त नगरसेवक तुमचे, सगळ्यात जास्त आमदार तुमचे. तुम्ही का हसताय? कारण का तर तीन वर्ष निवडणुका नाहीत. हा असा निर्लज्जपणा मी आधी कधीच नाही बघितला, असा हल्लाबोल ठाकरेंनी केला आहे. मुख्यमंत्र्यांवर टीका मिसिंग लिंक दुर्घटनेवर भाष्य करताना अमित ठाकरे म्हणाले, स्लॅब कोसळून बंद पडले आणि मुख्यमंत्री साहेब बोलतायत की हे ट्रायल आणि एरर आहे. पहिला पावसाचा ट्रायल असतो. समजा एक ब्रिज कोसळला तर उद्या तुम्ही सांगणार की ‘आमचे ट्रायल आहे, आम्ही आता नवीन ब्रिज बांधू, आम्हाला चुका कळाल्या आता’, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. ऑपरेशन टायगर करत बसणार आहोत का? अमित ठाकरे म्हणाले, तुम्ही शिवसेनेला बोलता, पण मुंबईत भाजप सत्तेत होते, आता आमचा महापौर आलाय, वेळ लागणार काम करायला. तुम्ही त्यांच्याबरोबतर नव्हता का? 25 वर्ष तुम्ही त्यांच्यासोबत नव्हता का? राज साहेबांना नाशिकमध्ये संधी मिळाली, एकही करप्शनचा आरोप नाही, रस्त्यावर खड्डे नाहीत. नाशिक तुंबले नाही, लोक मेली नाहीत. आपण या प्रश्नांवर कधी बोलणार आहोत? की आपण फक्त ऑपरेशन टायगर करत बसणार आहोत? नीच प्रकारचे राजकारण चालू आहे, अशी टीका ठाकरे यांनी केली आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
