जागेच्या वादातून कामगाराला मारहाण: नगरसेविकेच्या पतीसह आठ जणांवर गुन्हा, खराडी पोलिसांकडून तपास सुरू – Pune News

जागेच्या वादातून कामगाराला मारहाण:  नगरसेविकेच्या पतीसह आठ जणांवर गुन्हा, खराडी पोलिसांकडून तपास सुरू – Pune News



पुणे नगर रस्त्यावरील खराडी येथे जागेच्या वादातून एका कामगाराला मारहाण केल्याप्रकरणी भाजपा नगरसेविकेच्या पतीसह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत कामगाराचा मोबाईलही हिसकावून घेण्यात आला. खराडी पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे. अल्ताफ अहमद शेख (वय २६, रा. खराडी, पुणे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, भाजपा नगरसेविकेचे पती प्रीतम खांदवे, पंकज संजय पाटोळे, अभिषेक खडके, सुरज आणि अन्य चार जणांविरुद्ध खराडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. फिर्यादी अल्ताफ शेख हे पार्वती जीवन पाटील यांच्या खराडी येथील सर्व्हे क्रमांक १३२/२ या जागेवर देखरेखीचे काम करतात. संबंधित जागेवरून प्रीतम खांदवे आणि जागामालक यांच्यात यापूर्वी वाद झाला होता. तहसीलदार कार्यालयाने या जागेत प्रवेश करण्यास मनाईचे आदेश दिले होते. ३० मे २०२६ रोजी अल्ताफ शेख जागेवर काम करत असताना, प्रीतम खांदवे यांच्यासह काही जण जेसीबी घेऊन जबरदस्तीने जागेत घुसले. अल्ताफ यांनी जागामालकांना फोन करण्याचा प्रयत्न करताच, पंकज पाटोळे यांनी त्यांचा मोबाईल हिसकावून घेतला. त्यानंतर प्रीतम खांदवे यांनी साथीदारांना ‘याला उचला आणि चांगला मार द्या’ असे सांगितले. सुरज आणि अभिषेक यांनी दगड व लोखंडी वस्तूने मारहाण केली, तसेच लाथाबुक्क्यांनीही बेदम मारहाण केली. या हल्ल्यात अल्ताफ शेख यांच्या डोक्याला दुखापत होऊन रक्तस्त्राव झाला. मारहाणीनंतर आरोपींनी अल्ताफ शेख यांचा मोबाईल पुन्हा हिसकावून घेतला. अल्ताफ यांनी आरोपींच्या तावडीतून सुटका करून वॉचमन केबिनमध्ये धाव घेतली आणि तेथून जागामालकांचे पती जीवन पाटील यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. खराडी पोलिसांनी आरोपींविरुद्ध मारहाण, धमकी आणि जबरी चोरीचे गुन्हे दाखल केले असून, पुढील तपास सुरू आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp