digital products downloads

नसरापूर अत्याचार-हत्या प्रकरण: 15 दिवसांत 1100 पानांचे आरोपपत्र दाखल; 50 हून अधिक साक्षीदार, फॉरेन्सिक पुरावे जोडले – Pune News

नसरापूर अत्याचार-हत्या प्रकरण:  15 दिवसांत 1100 पानांचे आरोपपत्र दाखल; 50 हून अधिक साक्षीदार, फॉरेन्सिक पुरावे जोडले – Pune News



पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या पाशवी अत्याचार आणि हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. या प्रकरणातील नराधम आरोपीला कठोरात कठोर आणि फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी अत्यंत जलद गतीने तपास चक्रे फिरवून मोठी कामगिरी बजावली आहे. पोलिसांनी घटनेच्या अवघ्या १५ दिवसांच्या आत पुणे न्यायालयात तब्बल ११०० पानांचे दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल केले आहे. या प्रकरणाची सुनावणी आता फास्टट्रॅक कोर्टात होणार असून, दररोज जलद गतीने हा खटला चालवला जाणार आहे. आरोपी भीमराव कांबळे याला कायद्याच्या कचाट्यातून सुटू न देण्यासाठी पोलिसांनी शास्त्रीय आणि तांत्रिक पुराव्यांची मोठी साखळी न्यायालयासमोर सादर केली आहे. आरोपपत्रात ५० हून अधिक महत्त्वपूर्ण साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. गुन्ह्याशी संबंधित वैद्यकीय पुरावे (Medical Evidence) आणि न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा (Forensic Lab) अहवाल यात जोडण्यात आला आहे. घटनेशी संबंधित ५० हून अधिक फोटो आणि काही महत्त्वपूर्ण व्हिडिओ पुरावे म्हणून जोडले आहेत. या सर्व भक्कम पुराव्यांमुळे येत्या आठवडाभरात फास्टट्रॅक कोर्टात या खटल्याची प्रत्यक्ष सुनावणी सुरू होणार असून, आरोपीला तातडीने शिक्षा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्र दिनी घडले होते कृत्य; राज्यभरात तीव्र पडसाद १ मे रोजी संपूर्ण राज्यात ‘महाराष्ट्र दिन’ साजरा होत असताना, नसरापूर येथे ६५ वर्षीय नराधम भीमराव कांबळे याने हे कृत्य केले होते. पीडित साडेतीन वर्षांची चिमुरडी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी आपल्या आजीकडे आली होती. आरोपीने तिला फूस लावून घराजवळील एका गोठ्यात नेले, तिथे तिच्यावर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केली. पाप लपवण्यासाठी नराधमाने चिमुरडीचा मृतदेह गोठ्यातील शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवून ठेवला होता. मुलगी बेपत्ता झाल्याने गावात शोध सुरू असताना, ती आरोपी भीमराव सोबत जाताना काहींना दिसली होती. याच धाग्यावरून पोलिसांनी तपास करत हा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला आणि आरोपीला बेड्या ठोकल्या. या घटनेनंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त करत आरोपीला फाशी देण्याची मागणी करणाऱ्या जनआंदोलनांची लाट उसळली होती. आरोपी सराईत गुन्हेगार; आधीही पोक्सो अंतर्गत अटक पोलिस तपासात आरोपी भीमराव कांबळे (वय ६५, व्यवसाय- मजूर) याच्याबाबत अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा आरोपी सराईत आणि विकृत मानसिकतेचा आहे. १९९८ मध्ये आरोपीवर सर्वात आधी विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. तसेच २०१५ मध्ये देखील त्याच्यावर ‘पोक्सो’ (POCSO) आणि विनयभंगाचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला होता, मात्र २०१९ मध्ये त्याची या गुन्ह्यातून सुटका झाली होती.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp