digital products downloads

पत्नी, दोन मुलांना हार अर्पण करत आत्महत्या: कुटुंबाचे अडीच वर्षांपूर्वी झाले होते निधन; कोल्हापुरात एकाने नैराश्यातून उचलले टोकाचे पाऊल – Maharashtra News

पत्नी, दोन मुलांना हार अर्पण करत आत्महत्या:  कुटुंबाचे अडीच वर्षांपूर्वी झाले होते निधन; कोल्हापुरात एकाने नैराश्यातून उचलले टोकाचे पाऊल – Maharashtra News



अडीच वर्षांपूर्वी झालेल्या एका अपघातात पत्नी व दोन मुलांना गमावलेल्या एका व्यक्तीने अपघातस्थळी आपल्या पत्नी व मुलांना हार अर्पण करत विष प्राशन करून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना कोल्हापुरात घडली आहे. या व्यक्तीचा मृतदेह काल सडलेल्या स्थितीत आढळला. विराट विठ्ठललाल गौतम (58) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते पुण्याच्या मांजरी बुद्रुक परिसरातील रहिवासी होते. त्यांची पत्नी नीलू (50, मुलगी रिद्धीमा (17) व मुलगा सार्थक (13) यांचे 23 नोव्हेंबर 2023 रोजी कोल्हापुरातील पुईखडी लगत खासगी बस उलटून झालेल्या अपघातात मृत्यू झाला होता. विराट स्वतःही या अपघातात जखमी झाले होते. पण ते बचावले. तेव्हापासून ते नैराश्यात गेले होते. ते नियमितपणे या अपघातस्थळी येऊन आपल्या कुटुंबीयांना पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहत असत. आपल्या भावना व्यक्त करत असत. शुक्रवारी सकाळी काही वाहनधारकांना घाटात त्यांचा मृतदेह सडलेल्या स्थितीत आढळला. त्यांच्या खिशातील ओळखपत्रावरून त्यांची ओळख पटली. त्यांनी पत्नी व मुलांच्या विरहात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट विराट गौतम यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट केली. त्या पोस्टमध्ये ते म्हणतात, आज कोल्हापुरात देह त्याग केला आहे. कसं जगतोय माहिती नाही. जगामध्ये काही लोक अशी असतात, ज्यांच्याशिवाय जगणे कठीण असते. असे वाटते की, ती लोकं जगातून निघून गेल्यानंतर आम्ही कसे जगणार. माझे जगणे तेव्हाच संपले होते. गेल्या अडीच वर्षांपासून नीलू, रसिका व शर्विलशिवाय कसे जगलो हेच मला माहिती नाही. माझे जग त्याच क्षणी संपले होते. प्रेयसीला व्हिडिओ कॉल करून तरुणाची आत्महत्या दुसरीकडे, प्रेयसीला व्हिडिओ कॉल करून तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना नागपूरच्या लकडगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. आयुष अमर वामन असे मृताचे नाव आहे. आयुष हा नागपूर रेल्वे स्थानकावर हाऊस किपिंगचे काम करत होता. त्याचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. पण गत काही दिवसांपासून त्यांचे बिनसले होते. त्यामुळे आयुष तणावात होता. त्याने सोमवारी सकाळी आपल्या प्रेयसीला व्हिडिओ कॉल केला. तसेच तिच्यासमोरच स्कार्फपासून गळफास तयार करून आपण आत्महत्या करत असल्याचे सांगितले. त्याच्या प्रेयसीने त्याला आत्महत्येच्या विचारापासून परावृत्त करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण अखेर त्याने स्कार्फ फॅनला अडवून गळफास घेतला. आत्महत्येपूर्वी त्याने आपल्या मोबाईलमधील चॅट्सही डिलिट केले. पोलिसांनी त्याचा फोन न्यायवैद्यक तपासणीसाठी पाठवत पुढील तपास सुरू केला आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp