
शेजारी राहणाऱ्या परजातीच्या मुलासोबत प्रेमसंबंध असल्याने एका संतप्त आईने आपल्याच पोटच्या मुलीची तिच्याच स्कार्फने गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना उल्हासनगर येथील असल्याचे समजते. आई आणि मुलीमध्ये रात्री दीडच्या सुमारास भांडण झाले होते. त्यानंतर मुलीने आपण पळून जाणार असल्याचे देखील सांगितले, त्यानंतर संतापलेल्या आईने मुलीच्याच स्कार्फने लेकीची गळा आवळून हत्या केली. घटनेची अधिक माहिती अशी की, उल्हासनगरच्या कॅम्प 1 मधील भैय्यासाहेब आंबेडकर परिसरात राहणाऱ्या 19 वर्षीय अमृता गरुड या तरुणीची तिच्या जन्मदात्या आईनेच गळा आवळून हत्या केल्याची अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अमृताचे त्याच परिसरातील एका परजातीतील तरुणासोबत प्रेमसंबंध होते, ज्याला तिची आई आशा गरुड हिचा तीव्र विरोध होता. याच कारणावरून रविवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास माय-लेकींमध्ये कडाक्याचे भांडण झाले. या वादादरम्यान अमृताने घर सोडून जाण्याची भाषा केल्याने संतापलेल्या आईने रागाच्या भरात स्कार्फच्या साहाय्याने स्वतःच्या पोटच्या मुलीचा गळा आवळून खून केला. या भयानक घटनेनंतर अमृताच्या वडिलांनी स्वतः उल्हासनगर पोलिस ठाण्यात जाऊन या प्रकाराची माहिती दिली. ज्यावरून पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी आई आशा गरुड हिला अटक केली आहे. या दुर्दैवी घटनेत अमृताचा मृत्यू झाला असून, घटनेनंतर तिच्या वडिलांनी स्वतः उल्हासनगर पोलिस ठाणे क्रमांक 1 मध्ये जाऊन या धक्कादायक प्रकाराची पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली. याप्रकरणी स्वतःच्याच मुलीचा खून करणाऱ्या आरोपी आईला (आशा गरुड) पोलिसांनी अटक केली असून, उल्हासनगर पोलिस ठाणे क्रमांक 1 चे अधिकारी आता या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
https://doonitednews.in/advertisement-rate-card/