मनसे-उबाठाकडून ‘जेन-झीं’चे आंदोलन हायजॅक करण्याचा प्रयत्न: आदित्य-अमितचे करिअर सेट करण्याच अजेंडा, भाजपची टीका – Mumbai News

मनसे-उबाठाकडून ‘जेन-झीं’चे आंदोलन हायजॅक करण्याचा प्रयत्न:  आदित्य-अमितचे करिअर सेट करण्याच अजेंडा, भाजपची टीका – Mumbai News

नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनामुळे धर्मेंद्र प्रधान यांना आपल्या शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल मुंबईत ठाकरे बंधूंची जल्लोष सभा आयोजित करण्यात आली. या मोर्चावरून भाजपचे मुख्य प्रव

.

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर-मंतर वरील विद्यार्थ्यांचे मागील महिनाभरापासून आंदोलन सुरू होते. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ठाकरे बंधुंच्या वतीने आज तिरंगा मोर्चा काढणार असल्याची घोषण दोन दिवसांपूर्वी केली होती. मात्र, कालच धमेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्यामुळे आजचा मोर्चाचे रुपांतर विद्यार्थ्यांचा विजयोत्सव साजरा करण्यासाठी जल्लोष सभेत करण्याचे ठरवले. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यासह दोन्ही पक्षातील नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या जल्लोष सभेत उपस्थित होते. या मोर्चावरून भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी टीका केली.

नेमके काय म्हणाले नवनाथ बन?

आंदोलनाच्या स्वरूपावर भाष्य करताना नवनाथ बन म्हणाले, “या मोर्च्यात कोणत्याही पक्षाचा अधिकृत झेंडा दिसत नसला, तरी संजय राऊत तुमचा अजेंडा आधीपासूनच ठरलेला आहे. या आंदोलनाचा सर्वसामान्य तरुण, ‘जेन-जी’ किंवा NEET परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांशी आणि त्यांच्या भवितव्याशी काहीही संबंध नाही. केवळ आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांचे राजकीय करिअर सावरण्यासाठीच मनसे आणि उभाटा गटाकडून हे आंदोलन हायजॅक केले जात आहे.”

संजय राऊतांना मोर्चात का बोलू दिले नाही?

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना या रॅलीत भाषण करू न दिल्यावरूनही नवनाथ बन यांनी जोरदार टोला लगावला. ते म्हणाले, “संजय राऊत, जर या आंदोलनात कोणताही छुपा अजेंडा नव्हता, तर मग तुम्हाला या रॅलीत भाषण का करू दिले गेले नाही? कारण तुम्ही तिथे बोलला असतात तर राहुल गांधींचा उदोउदो केला असता, त्यांचे कौतुक केले असते आणि या आंदोलनाचे सर्व श्रेय राहुल गांधींना देऊन टाकले असते. म्हणूनच तुम्हाला या आंदोलनात बोलू दिले गेले नाही.”

हे ही वाचा…

मुंबईत ठाकरेंची जल्लोष सभा:अंधभक्तांच्या विरोधात देशभक्त जिंकले – उद्धव ठाकरे; राज ठाकरेंकडून आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना आदरांजली

विद्यार्थ्यांच्या आंदोलनासमोर केंद्र सरकारलाही झुकावे लागले आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागला. याच पार्श्वभूमीवर मुंबईत ठाकरे बंधूंची जल्लोष सभा आयोजित करण्यात आली आहे. ही सभा मुंबईच्या सावरकर मार्गावर आयोजित करण्यात आली होती. सविस्तर वाचा…

शिक्षणव्यवस्थेची वाट लावणाऱ्यांचे कौतुक कशाला?:प्रधानांच्या पाठीशी उभे राहणे हीच अंधभक्ती, फडणवीसांच्या प्रतिक्रियेवर पवारांचा संताप

मनसे-उबाठाकडून 'जेन-झीं'चे आंदोलन हायजॅक करण्याचा प्रयत्न: आदित्य-अमितचे करिअर सेट करण्याच अजेंडा, भाजपची टीका - Mumbai News

नीट पेपरफुटीप्रकरणी कॉकरोच जनता पार्टीच्या तीव्र आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी 25 जुलै रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला. या राजीनाम्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या कामाचे कौतुक करत संपूर्ण भाजप परिवार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे ट्विट केले होते. फडणवीसांच्या याच ट्विटचा समाचार घेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. सविस्तर वाचा…

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

https://doonitednews.in/advertisement-rate-card/

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »