मुंबई लोकलमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर: धावत्या लोकलमध्ये प्रवाशांमध्ये रक्तरंजित राडा, 2 जण गंभीर जखमी, VIDEO – Mumbai News

मुंबई लोकलमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर:  धावत्या लोकलमध्ये प्रवाशांमध्ये रक्तरंजित राडा, 2 जण गंभीर जखमी, VIDEO – Mumbai News



मुंबईची लाइफलाइन समजल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस अत्यंत गंभीर आणि चिंताजनक होत चालला आहे. अवघ्या महिनाभरापूर्वी लोकल ट्रेनमध्ये झालेल्या एका तरुणाच्या हत्येची घटना ताजी असतानाच, 15 जुलै रोजी मध्यरात्री चालत्या लोकलमध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या रक्तरंजित राड्यात 2 प्रवासी गंभीर जखमी झाले असून, यामुळे मुंबईकरांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याशिवाय, चर्चगेट-विरार लोकल मधील हाणामारीचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. जून महिन्यात नालासोपारा लोकलमध्ये 24 वर्षीय मयांक लोहार या तरुणाची चाकूने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली होती. तर यापूर्वी जानेवारी महिन्यात मालाड स्थानकावर 32 वर्षीय कॉलेज प्राध्यापक आलोक सिंह यांच्यावरही चाकू हल्ला झाला होता. या पार्श्वभूमीवर, महायुती सरकारने रेल्वे पोलिसांना प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कडक उपाययोजना करण्याचे निर्देश दिलेले असतानाच या नवीन घटना घडल्या आहेत. धावत्या लोकलमध्ये रक्तरंजित राडा बुधवार, 15 जुलै रोजी मध्यरात्री 12:30 वाजताच्या सुमारास सीएसएमटी-अंबरनाथ लोकल ट्रेन ठाकुर्ली आणि डोंबिवली स्थानकादरम्यान धावत असताना हा प्रकार घडला. ट्रेनच्या लगेज डब्यात सीटवर बसण्याच्या जागेवरून आणि गर्दीतून तीन प्रवाशांमध्ये जोरदार वाद झाला. ‘कड्याने’ केला गंभीर हल्ला हा वाद इतका विकोपाला गेला की, त्यामध्ये राजू वाघे आणि साहिल खंदारे हे दोघे जण रक्ताच्या थारोळ्यात पडले. रेल्वे पोलिसांच्या (GRP) प्राथमिक तपासानुसार, आरोपी प्रीतेश कनोजिया याच्यासोबत हा वाद झाला होता. कोणत्याही धारदार शस्त्राचा वापर न करता, हातातील धातूच्या जड ‘कड्याचा’ मार लागल्याने दोन्ही प्रवाशांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तातडीने वैद्यकीय मदत ट्रेन कल्याण स्थानकावर पोहोचताच रेल्वे सुरक्षा बल (RPF) आणि गव्हर्नमेंट रेल्वे पोलीस (GRP) जवानांनी जखमींना ताब्यात घेतले. त्यांना तातडीने रुक्मिणीबाई रुग्णालयात प्रथमोपचार देऊन पुढील उपचारासाठी मुंबईच्या सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कल्याण जीआरपीने याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. कुर्ला स्थानकावर दहशत आणि गोंधळ बुधवारीच कुर्ला रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर एक व्यक्ती हातात लाकडी काठी घेऊन धावत सुटल्याने प्रवाशांमध्ये एकच घबराट पसरली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कुर्ला जीआरपीने तात्काळ कारवाई करत त्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. चर्चगेट-विरार लोकलचा व्हिडिओ व्हायरल वेस्टर्न लाईनवरही चर्चगेट-विरार लोकलच्या पुरुषांच्या डब्यात जागेवरून प्रवाशांमध्ये लाथाबुक्क्यांनी हाणामारी झाल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहे. रेल्वे प्रशासनाने या व्हिडिओच्या तारखेबाबत अधिकृत दुजोरा दिला नसला, तरी यामुळे नेटकऱ्यांनी मुंबईकरांच्या सुरक्षिततेबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. पुढे काय? कल्याण आणि कुर्ला रेल्वे पोलीस या दोन्ही प्रकरणांचा सखोल तपास करत आहेत. रेल्वे स्थानकांवरील आणि लोकल गाड्यांमधील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासून सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी शोधल्या जात आहेत. आगामी संसदेच्या आणि राज्याच्या अधिवेशनातही मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा विरोधकांकडून उपस्थित केला जाण्याची शक्यता आहे. रेल्वे सुरक्षा दल (RPF) रात्रीच्या लोकल प्रवासात गस्त वाढवण्याच्या तयारीत आहे. या लागोपाठ घडणाऱ्या हिंसक घटनांमुळे रोज प्रवास करणाऱ्या लाखो मुंबईकरांमध्ये प्रचंड भीती आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. रोजच्या प्रवासातील गर्दी आणि वाढता मानसिक तणाव यांमुळे प्रवाशांमधील सहनशीलता संपत चालल्याचे हे लक्षण मानले जात आहे. रेल्वे प्रशासनाने केवळ घोषणा न करता स्थानकांवर आणि धावत्या गाड्यांमध्ये प्रवाशांच्या जीविताच्या रक्षणासाठी तातडीने प्रत्यक्ष आणि कठोर पावले उचलावीत, अशी मागणी आता सर्व स्तरांतून जोर धरू लागली आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp