शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करा: बनावट, खते निविष्ठांपासून सावधान राहा, दापोरीत फलोत्पादन पिकांच्या कीड-रोग व्यवस्थापनावर शेतकरी प्रशिक्षण‎ – Jalgaon News

शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करा:  बनावट, खते निविष्ठांपासून सावधान राहा, दापोरीत फलोत्पादन पिकांच्या कीड-रोग व्यवस्थापनावर शेतकरी प्रशिक्षण‎ – Jalgaon News



“हवामान बदलाच्या या काळात शेतकऱ्यांनी आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करणे गरजेचे आहे. तसेच खते व बियाणे खरेदी करताना विशेष दक्षता घेऊन बनावट कृषी निविष्ठांपासून स्वतःचा बचाव करावा. माती परीक्षणावर आधारित अल्प खर्चिक नैसर्गिक शेतीकडे वळावे,” असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तालुक्यातील दापोरी येथे कृषी विभागातर्फे सन २०२६-२७ अंतर्गत आयोजित “फलोत्पादन पिकांवरील कीड व रोग व्यवस्थापन’ शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमात तज्ज्ञांनी या महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दापोरीचे सरपंच कुंदन कोळी होते. केळी संशोधन केंद्र (जळगाव) चे शास्त्रज्ञ डॉ. नितीन सातपुते यांनी केळी पिकावरील विविध कीड-रोगांची ओळख व प्रतिबंधात्मक आधुनिक व्यवस्थापनाची माहिती दिली. कृषी विज्ञान केंद्र (ममुराबाद) चे शास्त्रज्ञ प्रवीण गोरे यांनी एल निनोच्या संभाव्य धोक्यांच्या पार्श्वभूमीवर हवामान बदलास पूरक शेती आणि कृषी प्रक्रिया उद्योगातून उत्पन्नवाढीच्या संधींबाबत मार्गदर्शन केले. मंडळ कृषी अधिकारी ईश्वर पवार यांनी माती परीक्षणावर आधारित नैसर्गिक शेतीचे महत्त्व सांगितले. सहाय्यक कृषी अधिकारी अशोक सोनवणे यांनी ‘महाविस्तार कृषी’ अॅपमधील विविध शासकीय योजनांची माहिती दिली. तर, सहाय्यक कृषी अधिकारी सचिन पाटील यांनी खत-बियाणे खरेदीतील दक्षतेबाबत शेतकऱ्यांना जागरूक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक कृषी अधिकारी चंद्रकांत जगताप यांनी केले. आयोजनासाठी पल्लवी चौधरी व प्रतीक पाटील यांनी परिश्रम घेतले. या वेळी ईश्वरलाल चिंधू पाटील यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते. केळी पिकाचे कीड नियंत्रण गरजेचे केळी पिकाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी सुरुवातीपासूनच कीड व रोगांची लक्षणे ओळखून योग्य प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. आधुनिक व्यवस्थापन तंत्रज्ञानाचा वापर केल्यास उत्पादनात मोठी वाढ होऊ शकते. असे आवाहन डॉ. नितीन सातपुते यांनी केले.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp