
दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर पैठणसह तालुक्यातील ढोरकीन, बिडकीन, बालानगर, ढाकेफळ, चितेगाव परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली. चितेगाव आणि बिडकीनला दोन तास झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले होते, तर गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन, सावंगी, शिल्लेगाव, देवळी, रांजणगाव पोळ, सुलतानाबाद, वैजापूर तालुक्यातील शिऊर परिसरातही पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे पिकांना संजीवनी मिळणार असून, दुबार पेरणीचे संकट टळले आहे. बुधवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास पैठण तालुक्यात पावसाने पुनरागमन केले. बिडकीन व चितेगाव परिसरात मुसळधार पाऊस झाला, तर पैठण शहरासह तालुक्यात इतरत्र मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. या पावसामुळे करपण्याच्या मार्गावर असलेल्या खरीप पिकांना मोठा दिलासा मिळाला असून, बळीराजा सुखावला आहे. मात्र, बुधवारी बिडकीनचा आठवडी बाजार असल्याने अचानक आलेल्या या पावसामुळे किरकोळ व्यापाऱ्यांची मोठी धांदल उडाली. पंधरा दिवसांपासून दडी धरून बसलेला पाऊस बुधवारी शिऊर व परिसरात जोमाने बरसला. सुरुवातीचा अल्प पाऊस त्यातच जेमतेम ओलीवर शेतकऱ्यांनी बियाणे मातीत टाकले होते. मात्र अचानक पाऊस गायब झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते. या पावसामुळे पिकांना संजीवनी मिळणार आहे. लासूर स्टेशन, सावंगी, शिल्लेगाव, देवळी, रांजणगाव पोळ व सुलतानाबाद परिसरालाही बुधवारी ३५ मिनिटे पावसाने झोडपले. पावसामुळे कापूस, मका, सोयाबीन, बाजरी व तूर या पिकांना जीवदान मिळाले आहे. सिल्लोड आणि फुलंब्री, कन्नड तालुक्यात दिवसभर ढगाळ वातावरण होते. पेरणी केलेल्या पिकांना पावसाची आवश्यकता असून,पुढील दोन ते तीन दिवसांत पाऊस न झाल्यास दुबार पेरणीचे संकट निर्माण होणार आहे. लासूरला ३५ मिनिटे पाऊस वैजापूरला दुबार पेरणीचे संकट टळले : वैजापूर तालुक्यातील कोरड्या समजल्या जाणाऱ्या लोणी खुर्दसह डोंगरथडी परिसरातही पावसाने हजेरी लावली. परिसरात सोयाबीन, कापूस व मक्याची पिके पावसाअभावी करपू लागली होती. अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली होती. फुलंब्रीत ढगाळ वातावरण
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
