digital products downloads

माझे सर्वस्व हरपले, पण मी खचणार नाही: अहिल्यादेवी, येसुबाईंप्रमाणे निष्ठेने जनतेची सेवा करेल; प्रचाराच्या सांगता सभेत सुनेत्रा पवार भावुक – Pune News

माझे सर्वस्व हरपले, पण मी खचणार नाही:  अहिल्यादेवी, येसुबाईंप्रमाणे निष्ठेने जनतेची सेवा करेल; प्रचाराच्या सांगता सभेत सुनेत्रा पवार भावुक – Pune News



बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या महायुतीकडून निवडणुकीच्या रिंगणात उभ्या आहेत. बारामतीच्या ऐतिहासिक शारदा प्रांगणात विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराची सांगता सभा पार पडली. यावेळी आपल्या पतीच्या आठवणींनी सुनेत्रा पवार यांना अनेकदा गहिवरून आले. मी माझे सर्वस्व हरपले, पण मी थांबणार नाही, खचणार नाही, मागे हटणार नाही, असे त्यांनी म्हटले. तसेच येसुबाई जशा लढल्या, अहिल्याबाई होळकरांनी जसा कारभार चालवला आणि आपल्या लोकांना न्याय दिला, त्याच निष्ठेने मी तुमची सेवा करेल, असे आश्वासन बारामतीच्या जनतेला दिले. सुनेत्रा पवार म्हणाल्या, या निवडणुकीमध्ये सर्वच पक्षांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल सुरुवातीलाच मी मनापासून आभार मानते. पवार साहेब व सुप्रिया सुळेंचे विशेष आभार मानते. मला पाठिंबा उत्स्फुर्तपणे जाहीर पाठिंबा देणाऱ्या संस्था आणि संघटनांचे ऋण व्यक्त करते. हा पाठिंबा म्हणजे बारामतीच्या भवितव्याबद्दलची एकत्रित बांधिलकी आहे, असे मी मानते. पवार कुटुंबाच्या सामाजिक आणि राजकीय वारशाची पायाभरणी करणाऱ्या अजित पवारांच्या आजी शारदाबाई पवार यांचे आवर्जून आभार मानते. त्यांनी एक सून म्हणून केवळ पवारांचे कुटुंब सांभाळले नाही, तर त्यांनी संस्कार, नितीमुल्य आणि संघर्षाची भक्कम परंपरा निर्माण केली. यामधून पुढे विविध क्षेत्रांमध्ये मोठे नेतृत्व घडत गेले. त्यांनी कुटुंबापुरतेच मर्यादित न राहता, समाज आणि महाराष्ट्राच्या जडणघडणीतही मोलाचा वाटा उचलला. वारसा संघर्षाचा आणि कर्तृत्वाचा पवार साहेबांच्या दूरदृष्टीमधून आपण बारामतीच्या विकासाचा पाया रचला. खऱ्या अर्थाने अजितदादांनी अपार कष्टाने त्यावर कळस चढवला. पवार साहेबांचे आशीर्वाद आपल्यासाठी मोलाचे आहेत. आमच्या आई आशाताई अनंतराव पवार यांचा आशीर्वाद हा आमच्यासाठी सर्वात मोठा आधार आहे. खरं सांगायचं तर, बारामतीच्या ऐतिहासिक शारदा प्रांगणात आज आपल्या विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराची सांगता सभा होत आहे. आपल्याला माहीत आहे की, या मैदानाला संघर्षाची, एकजुटीची मोठी परंपरा आहे. या प्रांगणात अजितदादांना अनेकवेळा नागरी सत्कार करण्यात आलेला आहे. आज या सांगता सभेला उसळलेला जनसागर म्हणजे अजितदादांविषयी असलेला आपला सन्मान, आदर आणि प्रेम म्हणायला हरकत नाही. दादांशिवाय सभा घ्यावी लागेल, असे वाटले नव्हते या मंचावर उभे राहताना माझ्या अंतकरणात भावनांचा कल्लोळ माजला आहे. अजितदादांशिवाय आपल्याला ही सभा घ्यावी लागत आहे, हे मानायला मन तयारच नाही. गेली ३५ वर्षे पवार साहेबांच्या पावलांवर पाऊल टाकत अपार कष्ट करून दादांनी ही बारामती उभी केली. त्यांच्याशिवाय ही सभा घ्यावी लागेल, असे कधी स्वप्नातही वाटले नाही. आज बारामतीतील अबालवृद्ध दादांच्या आठवणीत अजुनही शोकाकुल आहे. दादा आपल्यात नाहीत, कटू सत्य स्वीकारावे लागेल मोबाईलवर अजितदादांचे व्हिडिओ पाहतात, त्यांचे भाषणे ऐकतात आणि अजितदादा अजुनही आपल्यात आहेत, या आभासेपोटी अजूनही त्याच भावनेत आहेत. त्यामुळे त्यांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नाहीत. त्यामुळे दादा आपल्यात नाहीत, यावर अजुनही विश्वास बसत नाही. अनेकजण म्हणतात, दादा परत येतील, मात्र दादा आपल्यात नाहीत हे कटू सत्य आपल्याला स्वीकारावे लागेल. दादांचे कार्य, त्यांची स्वप्ने या आपल्या सगळ्यांना मिळून पुढे घेऊन जावी लागणार आहेत. दादा कायम जनहितासाठी अविरत झटत राहिले अजितदादांनी विकसित केलेल्या बारामतीला राज्याचे विकासाचे मॉडेल बनवले होते. बारामतीला संपूर्ण देशात एक नंबरचा तालुका बनवणे हे दादांचे स्वप्न होते. अजितदादांनी १९८४ मध्ये सक्रीय राजकारणात प्रवेश केला. तेव्हापासून जनतेशी जोडलेली नाळ त्यांनी कधीच तोडली नाही. त्यांच्या राजकीय जीवनात आपण सगळेजण साक्षीदार आहात. अनेक चढउतार आले. पण ते कधीच डगमगले, खचले नाही. सत्ता असो वा नसो, दादा जनहितासाठी अविरत झटत राहिले. दररोज १६-१७ तास काम करणाऱ्या दादांनी या राज्याला समर्पित जनसेवेचा वास्तुपाठ घालून दिला. वक्तशीरपणा आणि आर्थिक शिस्त या दोन गुणांच्या जोरावर दादांनी आर्थिक घडी बसवली. दादांनी विकासाच्या आड राजकारण आणले नाही अर्थसंकल्पाची विक्रमी ११ वेळा जबाबदारी पार पाडताना, राज्याला विकासाने स्थैर्य देण्याचे शिवधनुष्य त्यांनी पेललेले आपण सर्वांनी पाहिले आहे. मात्र, हे करत असताना त्यांनी विकासाच्या आड कधीही राजकारण आणले नाही. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देताना दादांनी कधीच धर्म, पंथ कधीच बघितला नाही. दादांना प्रत्येक गावखेड्याची नस अजूक माहिती होती. त्याच जोरावर त्यांनी लोकांच्या मनात आपले स्थान निर्माण केलेले होते. आपल्या कामाच्या माध्यमातून सर्वांना आपलेसे करणारे ते आगळेवेगळे व्यक्तीमत्व होते. …त्याबद्दल मी सर्वांचीच मनापासून ऋणी बारामतीकरांच्या मनात दादांबद्दल अपार प्रेम आणि अढळ श्रद्धा आहे. बारामतीच्या घरातील तीन पिढ्या दादांच्या विचारांशी, कार्याशी आणि मूल्यांशी मनापासून जोडल्या गेलेल्या आहेत. ही केवळ साथ नाही, तर भावनेने बांधलेली घट्ट कौटुंबीक नाळ आहे. म्हणूनच तीन पिढ्यांचा विश्वास आणि आपुलकी हीच दादांच्या कार्याची खरी ताकद आहे. दादांच्या पुण्याईने बारामतीकरांसह संपूर्ण महाराष्ट्राकडून मला आणि माझ्या दोन मुलांना गेल्या दोन-अडीच महिन्यापासून भरभरून प्रेम, भावनिक आधार आणि खंबीर पाठिंबा मिळवला. त्याबद्दल मी सर्वांचीच मनापासून ऋणी आहे. तुमचा विकास हाच दादांप्रमाणे माझाही ध्यास आज मी इथे उभी आहे, महायुतीचा उमेदवार म्हणून. फक्त उमेदवार म्हणून नाही, दादांची स्वप्न घेऊन उभी आहे. त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी रणांगणात उतरली आहे. ही लढाई सोपी नाही, पण मी एकटी नाही. मला विश्वास आहे की माझ्या पाठीशी बारामतीकरांची ताकद उभी आहे. ही माती माझी आहे. तुम्ही माणसे माझी आहात आणि तुमचा विकास हाच दादांप्रमाणे माझाही ध्यास आहे. माझे सर्वस्व हरपले, सुनेत्रा पवार भावुक आज मी केवळ मत मागायला आलेली नाही. मी नाते टिकवायला आलेले आहे. माझ्यावर विश्वास ठेवा मी तुमचा विश्वास कधीच कमी होऊ देणार नाही. माझं दुःख फार मोठं आहे. माझे तर सर्वस्व हरपले आहे. पण लाखोंचा पोशिंदा गमावलेल्या आणि माझ्याकडे आशेने पाहणाऱ्या या पोरक्या जनतेकडे पाहिल्यानंतर दादांचे स्वप्न, त्यांच्या कर्तव्याची जाणीव आणि त्यांच्या पश्चात माझ्यावर आलेली जबाबदारी या साऱ्यांच्या बळावर हे शिवधनुष्य उचलून, तुमच्या सर्वांच्या आधाराने पुढे चालत राहण्याचा निर्धार केला आहे. यावेळी सुनेत्रा पवार भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. मी एका संघर्षयोद्धाची सहचारिणी, खचणार नाही दादांची जागा कोणीच घेऊ शकत नाही, पण त्याच्या कार्याचा वारसा पुढे नेण्यासाठी मी प्रयत्न करेल. दुःखाला कवटाळून न बसता मी विकास कामासाठी अजितदादांच्या पावलावर पाऊल ठेवणार. माझ्यासोबत कुणी असो वा नसो, जोपर्यंत तुम्ही बारामतीकर जनता माझ्या पाठिशी आहात, तोपर्यंत मी थांबणार नाही, खचणार नाही, मागे हटणार नाही. मी एका संघर्षयोद्धाची सहचारिणी आहे. येसुबाई जशा लढल्या, अहिल्याबाई होळकरांनी जसा कारभार चालवला आणि आपल्या लोकांना न्याय दिला, त्याच निष्ठेने मी तुमची सेवा करेल. शिव, शाहू, फुले, आंबेडकरांची विचारधारा ही महाराष्ट्राची ओळख आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुद्धा तीच मुलभूत दिशा राहिलेली आहे. यापुढेही ती तशीच राहील, अशी मी सर्वांना खात्री देते. अपघात प्रकरणी जे दोषी असेल त्याला कठोर शिक्षा व्हावी सुनेत्रा पवार म्हणाल्या, अजितदादांच्या अपघाताची चौकशीसाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची भेट घेतली आणि त्यांनी यात निष्पक्ष तपास होईल असे आश्वासन दिले आहे. जे कोणी दोषी असेल त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, हीच माझी देखील भावना आहे. सुनेत्रा पवारांनी केले मतदानासाठी आवाहन सुनेत्रा पवार म्हणाल्या, येत्या 23 तारखेला तुम्ही जे मत देणार आहात, ते केवळ एक उमेदवार म्हणून दिलेले मत नसेल, तर तुमचे आदरणीय दादांच्या प्रती असलेले प्रेम, नातं, ऋणानुबंध आणि दादांची तुमच्या सर्वांच्या प्रती असणारी आपुलकी व कौटुंबिक नातं दर्शवणारं द्योतक असेल. प्रत्येक मतदाराला मतदानासाठी प्रवृत्त करणे ही आपली जबाबदारी आहे. येत्या 23 तारखेला आपला मतदानाचा पवित्र हक्क बाजावण्यासाठी बारामतीला आवर्जून यावे असे आवाहन मी करते. उन्हाळा आहे त्यामुळे नियोजनबद्ध पद्धतीने आपण सर्व काम करू.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp