digital products downloads

डेक्कन पीएमपी स्थानकातून मद्यपीने PMP बस पळविली: पोलिसांच्या तत्परतेमुळे गंभीर दुर्घटना टळली – Pune News

डेक्कन पीएमपी स्थानकातून मद्यपीने PMP बस पळविली:  पोलिसांच्या तत्परतेमुळे गंभीर दुर्घटना टळली – Pune News



मद्यधुंद अवस्थेतील एकाने चक्क पीएमपी बस पळवून नेल्याची घटना डेक्कन जिमखाना भागात घडली. पोलिसांच्या तत्परतेमुळे गंभीर दुर्घटना टळली. मद्यपीला पकडण्यात आल्यानंतर त्याच्याविरुद्ध रात्री उशीरा डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. डेक्कन जिमखाना भागातील थांब्यावर पीएमपी बस लावण्यात आली होती. बस चावी स्टेअरिंगजवळ होती. शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास एक मद्यपी पीएमपी थांब्यावर फिरत होता. त्याने पीएमपीची चावी ताब्यात घेऊन बस सुरू केली. डेक्कन जिमखाना भागातून बस सुरू करुन मद्यपीने बस गोखले स्मारक चौकात (गुडलक चौक) नेली. त्या वेळी तेथील कलाकार कट्टा परिसरात आंदोलन सुरू होते. पोलीस कर्मचारी तेथे उपस्थित होते. डेक्कन येथील पीएमपी स्थानकातून मद्यपीने बस पळवून नेल्याची माहिती मिळाल्यानंतर बंदोबस्तावरील पोलिसांनी बस काही अंतरावर अडवली. मद्यपीला ताब्यात घेऊन त्याला डेक्कन पोलीस ठाण्यात नेले, अशी माहिती पोलिसांनी दिली. स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारातून २५ जानेवारी २०१२ रोजी संतोष माने याने एसटी बस पळवून नेली होती. भरधाव एसटीने एकापाठोपाठ वाहनांना धडक दिली. शंकरशेठ रस्ता, स्वारगेट परिसरात त्याने पादचारी, तसेच वाहनांना धडक दिली होती. या घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला होता, तसेच २७ जण जखमी झाले होते.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp