
नागपूर ते गोवा हा प्रस्तावित ‘शक्तिपीठ महामार्ग” म्हणजे सर्वसामान्यांचा विकास नसून उद्योगपतीच्या फायद्यासाठी आखलेला एक स्वतंत्र रस्ता आहे, असा आरोप स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे.नागपुरातील कोळसा गोव्यातील मडगाव बंदरापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि आगामी निवडणुकीसाठी कोट्यवधींचा निधी उभारण्यासाठी जनतेच्या करातून हा अट्टाहास सुरू असल्याची टीका त्यांनी केली. देव-धर्म आणि विकासाचा मुलामा देऊन सरकार जनतेची दिशाभूल करत असल्याचा यावेळी सांगितले. राजू शेट्टी म्हणाले की, नागपूर ते गोवा हे अंतरकापण्यासाठी आता 11 तास लागतात ते अंतर 8 तासावर येणार असल्याचे सांगितले जाते. मात्र या 8 तासांच्या प्रवासाला 14 हजारांचे खर्च येणार आहे. नागपूर ते गोवा विमानाचे प्रवास भाडे 3500 रुपये आहे व त्यासाठी केवळ 2 तासांचा वेळ लागतो आहे. त्यानंतर पत्रादेवी हे शक्तिपीठ या महामार्गाने जोडले जाणार असल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात मी तेथे जाऊन आलो आहे, ते महाराष्ट्र-गोवा सीमेवरील केवळ साडे तीन फूट उंचीचे एक छोटेसे मंदिर आहे. शासनाने धर्माच्या नावाने लोकांची दिशाभूल सुरू केली आहे. ..तोपर्यंत शेतकरी स्वस्थ बसणार नाही राजू शेट्टी म्हणाले की, या अनावश्यक प्रकल्पामुळे राज्याच्या तिजोरीवर 1 लाख कोटी रुपयांच्या कर्जाचा अतिरिक्त बोझा पडणार आहे. हा महामार्ग सामान्य जनतेच्या हिताचा नसून केवळ उद्योगपतींचे खिसे भरण्यासाठी आहे. जोपर्यंत हा शक्तीपीठ महामार्ग पूर्णपणे हद्दपार केला जात नाही, तोपर्यंत राज्यातील शेतकरी आणि जनता स्वस्थ बसणार नाही. सुपीक जमिनी बळकावणे अन्यायकारक राजू शेट्टी म्हणाले की, प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग सोलापूर जिल्ह्यातील माढा (12 गावे), पंढरपूर (6 गावे) आणि माळशिरस (12 गावे) या तालुक्यांतील अत्यंत सुपीक जमिनीतून जाणार आहे. या भागातील शेतकरी द्राक्षे, ऊस, केळी आणि भाजीपाला यांसारखी नगदी पिके घेतात. कोल्हापूर, सातारा आणि नागपूरला जाण्यासाठी आधीच सक्षम पर्यायी रस्ते उपलब्ध असताना, केवळ ठेकेदारांच्या फायद्यासाठी सुपीक जमिनी बळकावणे अन्यायकारक आहे. हा प्रकल्प पूर्णपणे शेतकरी विरोधी राजू शेट्टी म्हणाले की, हा 800 किलोमीटरचा ‘एक्सप्रेस हायवे’ दोन्ही बाजूंनी संरक्षक भिंतींनी बंदिस्त असेल. संपूर्ण प्रवासात केवळ 23 ठिकाणीच चढण्या-उतरण्याची सोय असल्याने स्थानिक शेतकऱ्यांसाठी किंवा प्रवाशांसाठी याचा उपयोग शून्य आहे. पालखी मार्ग किंवा रत्नागिरी-नागपूर महामार्गाला शेतकऱ्यांनी कधीही विरोध केला नाही, कारण ते लोकांच्या सोयीचे होते. मात्र, शक्तीपीठ महामार्गाची टोल वसुली 90 वर्षे चालणार असून हा प्रकल्प पूर्णपणे शेतकरी विरोधी आहे. दिव्य मराठी इनसाइड स्टोरी माजी आमदार तथा भाजप नेते रणजितसिंह मोहिते पाटील यांनी शक्तिपीठाच्या बाजूने उभे राहण्याची घोषणा करताच माजी खासदार राजू शेट्टी शेतकऱ्यांच्या सोबत वेळापुरात रस्त्यावर उतरले. मेळाव्यात सरकारवर ते जोरदार बरसले. सांगलीत आंदोलनामुळे शासनाने प्रस्तावित मार्गात बदल केला होता. आता माळशिरस तालुक्यात शेतकरी आंदोलन चेतवण्याची तयारी त्यांनी चालू करुन मोहिते यांना ही अप्रत्यक्ष आव्हान दिले आहे. शेतकरी कोणाच्या बाजूने राहतात काळच ठरवेल. 13 जिल्ह्यातून रस्त्याला विरोध संपूर्ण 13 जिल्ह्यातून प्रस्तावित रस्त्यास विरोध आहे.त्यामुळे हा रस्ता होणार नाही व आम्ही तो कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे, तालुका अध्यक्ष अजित बोरकर उपस्थित होते. मोजणीला संमती देऊ नका हा प्रस्तावित महामार्गाचे जमिनीची संयुक्तिक मोजणी गरजेची असून त्यासाठी संबंधित शेतकऱ्यांची संमती घ्यावी लागते. त्यामुळे अशा मोजणीला संमती देऊ नका, कुठे सह्या करू नका, तुम्ही ठाम रहा, हा रस्ता होऊ शकणार नाही. 2013 च्या कायद्यानुसार भरपाई अशक्य शासनाने काही एजंट लोकांना सोडले असून ते लोकांना याबाधित जमिनीत झाडे, फळबागा लावण्यास सांगत आहेतमात्र ही शेतकऱ्यांची फसवणूक असून त्याचे कसलेहीमूल्यांकन होणार नाही. त्यामुळे या बाधित शेतकऱ्यांनी असा खर्च करण्याच्या भानगडीत पडू नये
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.






