
सेनगाव तालुक्यातील कापडसिंगी शिवारात अवैधरित्या गांजा विक्री करणाऱ्या एका व्यक्तीला सेनगाव पोलिसांच्या पथकाने शनिवारी ता. २ ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून २लाख रुपये किंमतीचा ४.८०० ग्राम गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी सेनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हिंगोली जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून अवैध व्यवसायाविरुध्द पोलिसांनी कंबर कसली असून अवैध मटका, जुगार अड्यांसोबतच अवैध वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जात आहे. या सोबतच ग्रामीण भागातून गांजाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांविरुध्द कारवाई केली जात असून त्यासाठी स्वतंत्र पथक स्थापन करण्यात आले आहे. दरम्यान, जिल्हयातील अवैध व्यवसाय समुळ नष्ट करण्यासाठी पोलिस अधिक्षक निलाभ रोहन, अप्पर पोलिस अधिक्षक कमलेश मीना, गुन्हा शाखेचे निरीक्षक मोहन भोसले यांनी स्थानिक पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांसोबतच स्थानिक गुन्हे शाखेची पथके स्थापन केली आहेत. या पथकाकडून गांजा विक्रीबाबतची माहिती घेऊन छापे टाकले जात आहे. दरम्यान, सेनगाव तालुक्यातील कापडसिंगी शिवारात एक व्यक्ती गांजा विक्री करीत असल्याची माहिती सेनगाव पोलिसांना मिळाली होती. त्यावरून सेनगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक मस्के यांनी नायब तहसीलदार देवराव कारगुडे यांच्या सह पोलिस कर्मचारी जीवन मस्के, तुळशीराम वंजारे, सुभाष चव्हाण, गजानन मुटकुळे, जैस्वाल, गजानन सरकटे यांच्या पथकाने कापडसिंगी शिवारात जाऊन छापा टाकला. यावेळी पोलिसांनी नंदाजी मोहन चव्हाण (रा. खुरामपुर जि. बुलढाणा) यास ताब्यात घेतले असून त्याच्याकडून २ लाख रुपये किंमतीचा गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी सेनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हे ही वाचा… हिंगोलीच्या जवळा बाजारमध्ये तरुणाचा दगडाने ठेचून खून:पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल, संशयित आरोपींचा शोध सुरू औंढा नागनाथ तालुक्यातील जवळाबाजार येथे एका 26 वर्षीय तरुणाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना शनिवारी ता. 2 पहाटे सह वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह औंढा नागनाथ पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांना या घटनेतील महत्वाचे धागेदोरे हाती लागले असून आरोपीच्या अटकेनंतरच खूनाचे नेमके कारण समोर येणार आहे. सविस्तर वाचा…
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.






