आसडीच्या सुपुत्रांची भरारी; एक शास्त्रज्ञ तर सहा तरुण ‘अग्निवीर’: ग्रामपंचायत, ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आला सत्कार‎ – Chhatrapati Sambhajinagar News

आसडीच्या सुपुत्रांची भरारी; एक शास्त्रज्ञ तर सहा तरुण ‘अग्निवीर’:  ग्रामपंचायत, ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आला सत्कार‎ – Chhatrapati Sambhajinagar News



सिल्लोड तालुक्यातील आसडी गावातील होतकरू युवकांनी शिक्षण आणि संरक्षण क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. विज्ञान क्षेत्रात शास्त्रज्ञ म्हणून झेप घेणारे रोहित पाटील ढोरमारे तसेच भारतीय सैन्यदलातील ‘अग्निवीर’ पदासाठी निवड झालेले प्रवीण सर्जेराव मिरगे, वैभव आप्पा करपे, आकाश कैलास मिरगे, सागर गणपत सुरडकर, राघव समाधान सुरडकर आणि आणखी एका युवकाच्या यशामुळे संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या सर्व यशस्वी युवकांचा ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने नुकताच भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. फेटा, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. रोहित ढोरमारे यांनी विज्ञान संशोधन क्षेत्रात शास्त्रज्ञ म्हणून मिळवलेले यश हे केवळ आसडी गावासाठी नव्हे तर संपूर्ण सिल्लोड तालुका आणि जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे वक्त्यांनी नमूद केले. ग्रामीण भागातून शिक्षणाच्या बळावर राष्ट्रीय स्तरावर झेप घेण्याची प्रेरणा त्यांनी नव्या पिढीला दिली असल्याचेही सांगण्यात आले. तसेच भारतीय सैन्यदलात ‘अग्निवीर’ म्हणून निवड झालेल्या युवकांनी कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर हे यश संपादन केले आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून देशसेवेची संधी मिळवणाऱ्या या युवकांचा संघर्ष ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. देश रक्षणाचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या अनेक युवकांसाठी हे यश मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. “देशसेवा आणि विज्ञान सेवा या दोन्ही क्षेत्रांत आसडीच्या सुपुत्रांनी मिळवलेले यश गावाच्या नव्या ओळखीचे प्रतीक आहे. त्यांच्या यशामुळे गावातील विद्यार्थ्यांमध्ये नवी उमेद आणि आत्मविश्वास निर्माण झाला आहे,” अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या आहे. या सत्कार सोहळ्याला तंटामुक्ती अध्यक्ष गंगाधर पाटील मेटे, सांडू पाटील सुरडकर, रघुनाथ करपे, भागवत पाटील मिरगे, संतोष पाटील मिरगे, गोपाल पाटील तुपे, अनिल गावंडे सर, कैलास पाटील सुरडकर, विष्णू मिरगे, अण्णा मिरगे, विष्णू मेटे, दादाराव साळवे, दगडूबा मिरगे, विश्राम मिरगे, पिराजी मिरगे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आसडीचा दुहेरी अभिमान रोहित पाटील ढोरमारे – शास्त्रज्ञ प्रवीण सर्जेराव मिरगे – अग्निवीर वैभव आप्पा करपे – अग्निवीर आकाश कैलास मिरगे – अग्निवीर सागर गणपत सुरडकर – अग्निवीर राघव समाधान सुरडकर – अग्निवीर

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp