
भोंदूबाबा अशोक खरात याच्यावरील महिला लैंगिक अत्याचार प्रकरणात राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्यावर त्यांच्याशी आर्थिक संबंध असल्याचा आरोप झाला होता, ज्यावरून चाकणकर आणि त्यांच्या कुटुंबीयांची चौकशीही करण्यात आली होती. मात्र, नुकत्याच एका सोशल मीडिया व्हिडीओद्वारे चाकणकर यांनी हे आरोप फेटाळून लावत आपला खरात याच्याशी कोणताही संबंध नसून आपली केवळ बदनामी केली जात असल्याचे स्पष्ट केले आहे. यावर आता रुपाली ठोंबरे पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, खरातच्या व्हायरल व्हिडीओंचा संदर्भ देत त्यांनी चाकणकर यांच्या दाव्यांवर सडकून टीका केली आहे. रुपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या, भोंदूबाबा खरात प्रकरण समोर आल्यानंतर खरात आणि चाकणकर यांचे पाद्यपूजनाचे व्हिडीओ आले. त्यांनीच भोंदूबाबाची तक्रार घ्यायची नाही, असे पोलिसांना सांगितले होते, असा आरोप ठोंबरे यांनी केला. तसेच खरातने ज्या ज्या वेळी महिलांचे लैंगिक शोषण केले. त्यावेळी चाकणकर या महिलांचे रक्षण करण्यासाठी त्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर होत्या. त्यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर केला, अशी टीका त्यांनी केली आहे. माता-भगिणींवर देवाच्या नावाखाली भीती दाखवून लैंगिक अत्याचार झाला पुढे बोलताना रुपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या, स्त्रींचा लढा लढण्यासाठीच चाकणकर यांना महिला आयोगाच्या पदावर बसवण्यात आले होते. रुपाली चाकणकर यांना खरातच्या प्रकरणात सहआरोपी केले पाहिजे. रुपाली चाकणकर आणि खरात मिळूनच रॅकेट चालवत होते. म्हणूनच चाकणकर यांच्याकडून खरातला वाचवण्याचा प्रयत्न चालू होता. तुमच्या या घाणेरड्या प्रकारामुळेच आमच्या महाराष्ट्रातील माता-भगिणींवर देवाच्या नावाखाली भीती दाखवून लैंगिक अत्याचार झाला आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. त्या टेबलवर महिलांची इज्जत उतरवली गेली रुपाली चाकणकर या छानपैकी पदावर बसल्या होत्या. पण आमच्या माता-भगिनींची इज्जत त्या टेबलावर देवाच्या नावाखाली घाबरवून उतरवली गेली. त्यावेळी चाकणकर कुठे होत्या. चाकणकर यांनी पेटून उठायला हवे होते, असे ठोंबरे यांनी म्हटले आहे. रूपाली ठोंबरे यांच्या या प्रखर टीकेनंतर आता रुपाली चाकणकर यावर नेमकी काय प्रतिक्रिया देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
