उद्धव ठाकरेंची शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होणार: रवी राणांचा मोठा दावा, राष्ट्रवादीबाबतही मोठं वक्तव्य; शशिकांत शिंदेंचे प्रत्युत्तर – Mumbai News

उद्धव ठाकरेंची शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होणार:  रवी राणांचा मोठा दावा, राष्ट्रवादीबाबतही मोठं वक्तव्य; शशिकांत शिंदेंचे प्रत्युत्तर – Mumbai News



राज्यात विधानपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असतानाच महाविकास आघाडीतील संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चांना नवं वळण मिळालं आहे. अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे दोन्ही पक्ष लवकरच काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याचा दावा केला आहे. अमरावतीत माध्यमांशी बोलताना रवी राणा म्हणाले की, शरद पवार यांनी काँग्रेसमध्ये परत जाण्याची इच्छा व्यक्त केली असून त्यासंदर्भातील प्रस्तावही दिला गेला आहे. या प्रस्तावावर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी विचार करत असल्याचा दावाही त्यांनी केला. याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबाबतही त्यांनी भाष्य करत, संजय राऊत हे वारंवार दिल्लीतील १० जनपथवर जात असून काँग्रेससोबत विलिनीकरणासाठीच हालचाली सुरू असल्याचा टोला लगावला. शशिकांत शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर
मात्र रवी राणांच्या या दाव्याला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. विलिनीकरणाच्या चर्चा पूर्णपणे फेटाळून लावत त्यांनी काँग्रेस नेते नाना पटोले यांच्यावर निशाणा साधला. नाना पटोले यांनी आधी काँग्रेसची मूठ बांधावी आणि स्वतःचा पक्ष मजबूत करावा. राष्ट्रवादीची काळजी करण्याची त्यांना गरज नाही,” असे शिंदे म्हणाले. दरम्यान, विधानपरिषद निवडणुकीत काही ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी माघार घेतल्याने महायुतीच्या सहा जागा बिनविरोध झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर रवी राणांनी काँग्रेसवरही टीका करत, राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसला दुसऱ्यांना पाठिंबा द्यावा लागत आहे, ही नामुष्कीची बाब आहे, असा टोला लगावला. त्यामुळे विधानपरिषद निवडणुकीच्या धामधुमीत विलिनीकरणाच्या चर्चांनी पुन्हा एकदा राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. संजय राऊत म्हणाले- विलीनीकरणावर राष्ट्रीय स्तरावर चर्चा सुरू दुसरीकडे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना तृणमूल काँग्रेस (TMC) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांसारख्या पक्षांनी पुन्हा काँग्रेसमध्ये विलीन व्हावे, असा सल्ला दिला आहे. भाजपविरोधात एक मजबूत राष्ट्रीय पर्याय उभा करण्यासाठी काँग्रेसच्या मूळ विचारसरणीतून बाहेर पडलेल्या सर्व लहान पक्षांनी एकत्र येऊन काँग्रेस पक्षात विलीन झाले पाहिजे, असे राऊत यांनी म्हटले आहे. काँग्रेसचे मिशन विलीनीकरण!:शरद पवारांच्या राष्ट्रवादीसह ममता बॅनर्जीनाही प्रस्ताव, नाना पटोले म्हणाले- देश वाचवण्यासाठी काँग्रेससोबत यावे लागेल! राज्यात आणि देशाच्या राजकारणात सध्या एक नवी चर्चा रंगू लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), तृणमूल काँग्रेस आणि इतर प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार का, या चर्चांना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांच्या वक्तव्यामुळे नवे बळ मिळाले आहे. नागपुरात माध्यमांशी बोलताना पटोले यांनी भाजपविरोधी धर्मनिरपेक्ष शक्तींना एकत्र येण्याची गरज असल्याचे सांगत, अशा प्रकारची प्रक्रिया सुरू झाल्याचे सूचक विधान केले. सविस्तर वाचा

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp