
येथील गौरखेडेपुरा स्थित आई भवानी देवस्थानच्यावतीने भवानी चौक येथे आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. यावेळी तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून नागरिकांच्या आरोग्याची मोफत तपासणी करण्यात आली. शिबिरात दमा (अस्थमा), श्वसनविकार, डोळे, कान, नाक व घसा, नेत्र यासंबंधित विविध आजारांची तपासणी करण्यात आली. डोळ्यांची तपासणी करताना मोतीबिंदू, काचबिंदू व नेत्रदोष संबंधी माहिती देण्यात आली. याशिवाय काही रुग्णांची संगणक यंत्राद्वारे फुफ्फुसांची तपासणी करण्यात येऊन आवश्यक औषधीचेही मोफत वितरण करण्यात आले. श्वसनविकार तज्ज्ञ डॉ. परीक्षित ठाकरे, नेत्रविकारतज्ज्ञ डॉ. दिशा ठाकरे तसेच कान, नाक व घसा तज्ज्ञ डॉ. तेजल सोलार (लाखेकर) यांनी तपासणीची सेवा दिली. एवढेच नव्हे तर संबंधित रुग्णांना आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शनही केले. या शिबिरासाठी अंकुश प्रमोदराव देशमुख, श्रेयश देशमुख, डॉ. रितेश गोरे (फिजिओथेरपिस्ट), सूरज तंवर, मयूर वानखडे, विजय बांते, भूषण मुंदाणे, सुमित अनासने, ऋतिक देशमुख, भाग्येश गौरखेडे, अक्षय रोडगे, रोहन वानखडे, सूरज गौरखेडे, दिनेश लोहकरे, प्रथमेश गौरखेडे, यश गौरखेडे, कुणाल गौरखेडे, अक्षय तायवाडे, अंश शिकरे, आकाश कोसे व विक्रांत ठाकरे यांनी उपस्थित राहून सहकार्य केले. शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून अनेकांनी तपासणीचा लाभ घेतला. आयोजकांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व सहकारी, वैद्यकीय तज्ज्ञ आणि उपस्थित नागरिकांचे आभार मानले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
