
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजवून देणाऱ्या घटनांवर आधारित ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘आता सगळं उघड होणार…!’ अशी टॅगलाईन असलेल्या या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेत्री आणि नृत्यांगना दीपाली सय्यद मुख्य भूमिकेत दिसणार असून, त्यांच्या फर्स्ट लूकने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. राजकीय भूकंपावर प्रकाशझोत हा चित्रपट महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि आध्यात्मिक घडामोडींमधील एक अतिशय महत्त्वाचे आणि संवेदनशील प्रकरण जगासमोर आणणार आहे. चित्रपटात अनेक वास्तववादी व्यक्तिरेखा पाहायला मिळणार असून, दीपाली सय्यद यांच्यासोबत दिग्गज अभिनेते उदय टिकेकर हे देखील फर्स्ट लूकमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. हा चित्रपट २ ऑक्टोबर २०२६ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. दिग्दर्शकांचा दीपाली यांच्यावर विश्वास चित्रपटाचे दिग्दर्शन स्वरूप बी. सावंत करत असून सध्या याचे चित्रीकरण वेगाने सुरू आहे. दीपाली सय्यद या आपल्या आव्हानात्मक भूमिकेला पूर्ण न्याय देतील, असा विश्वास दिग्दर्शकांनी व्यक्त केला आहे. या चित्रपटाची कथा सागरकुमार एस. जैन यांनी लिहिली असून, पटकथा आणि संवादलेखन संजय नवगिरे यांनी केले आहे. प्रेक्षकांमध्ये उत्सुकता फ्लेमिंगो क्रिएशन आणि मातोश्री एन्टरटेन्मेंट वर्ल्ड प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती देवेंद्र भट, सुर्यकांत भुंडे आणि प्रशांत कदमपुरे करत आहेत. राजकीय विषयावर आधारित असल्यामुळे घोषणेपासूनच या चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. हे ही वाचा.. श्रद्धा कपूरचा ‘ईठा’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात:लावणीसम्राज्ञी विठाबाईंच्या जीवनपटाचे शीर्षक बदलण्याची मागणी बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर हिच्या आगामी ‘ईठा’ या चित्रपटाचा टीझर रिलीज होताच तो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. हा चित्रपट महाराष्ट्रातील प्रसिद्ध लावणीसम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित आहे. मात्र, चित्रपटाचे नाव ‘ईठा’ ठेवल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाने यावर तीव्र आक्षेप घेतला असून चित्रपट निर्मात्यांना नाव बदलण्याचा इशारा दिला आहे. सविस्तर वाचा
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
