
गण गण गणात बोते, जय जय रामकृष्ण हरी च्या गजरात निघालेल्या श्रीक्षेत्र शेगाव येथील संत गजानन महाराज पायी दिंडीचे बुधवारी ता. 1 मराठवाड्यात आगमन झाले असून मराठवाडा व विदर्भाच्या सिमेवर असलेल्या् वाढोणा येथे दिंडीचे उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. श्रीक्षेत्र शेगाव येथील संत गजानन महाराजा यांच्या पायी दिंडी सोहळ्याचे आज मराठवाड्यात वाढोणा येथे आगमन होणार असल्याने सकाळ पासूनच परिसरातील भाविक दिंडीच्या स्वागतासाठी हजर झाले होते. सकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास या दिंडी सोहळ्याचे मराठवाड्यात आगमन झाले. गण गण गणात बोते, जय जय रामकृष्ण हरी च्या गजरात निघालेल्या या दिंडीचे वाढोणा शिवारात आगमन झाल्यानंतर भाविकांनी हरिनामाचा गजर केला. या दिंडी सोहळ्यात खांद्यावर भगवी पताका घेऊन 700 वारकरी सहभागी झाले आहेत. या वारकऱ्यांचेही यावेळी स्वागत करण्यात आले. दिंडी सोहळ्यामुळे परिसरातील वातावरण धार्मिक बनले होते. दरम्यान, वाढोणा शिवारात शिवाजीराव मुटकुळे, माजी सभापती संजय उर्फ भैय्या देशमुख यांच्यासह भाविकांनी यांनी दिंडीचे पूजन करून मराठवाड्यात स्वागत केले. यावेळी भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी सेनगाव, गोरेगाव पोलिसांच्या पथकानेही दिंडीचे स्वागत करून पोलिस बंदोबस्त ठेवला होता. तर आरोग्य विभागाचे पथकही यावेळी तैनात होते. दरम्यान, आता दिंडीचा पुढील मुक्काम ता. 2 जुलै रोजी हिंगोली हिंगोली तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे तर ता. 3 जुलै रोजी जवळा बाजार येथे मुक्काम असणार आहे. ता. 4 जुलै रोजी दिंडी परभणी जिल्हयात प्रवेश करणार आहे. असा असेल दिंडीचा मुक्काम ता 4 जुलै श्री क्षेत्र त्रिधारा, 5 जुलै परभणी, 6 जुलै दैठणा, 7 जुलै गंगाखेड, 8 जुलै परळी ( थर्मल ), 9 जुलै परळी वैजनाथ, 10 जुलै अंबाजोगाई, 11 जुलै बोरी सावरगाव, 12 जुलै कळंब,13 जुलै तेरणा सा. कारखाना, 14 जुलै उपाळा (माकडाचे), 15 जुलै धाराशिव, 16 जुलै श्री क्षेत्र तुळजापूर, 17 जुलै ऊळे,18 व 19 जुलै सोलापूर (दोन दिवस), 20 जुलै तिरहे, 21 जुलै माचणूर, 22 जुलै श्री क्षेत्र मंगळवेढा, 23 ते 28 जुलै: श्री क्षेत्र पंढरपूर (येथे 23 जुलै रोजी आगमन होऊन सहा दिवस मुक्काम राहील.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
