मेळघाटात ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’चा यशस्वी प्रयोग: बोअरवेलला नवसंजीवनी; घराच्या छतावरील पाणी थेट भूजलात – Amravati News

मेळघाटात ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’चा यशस्वी प्रयोग:  बोअरवेलला नवसंजीवनी; घराच्या छतावरील पाणी थेट भूजलात – Amravati News



मेळघाटातील अनेक गावांमध्ये उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. यावर मात करण्यासाठी ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’चा एक यशस्वी प्रयोग करण्यात आला आहे. घराच्या छतावरून वाहून जाणारे पाणी थेट भूजलात पोहोचवल्याने एका बोअरवेलला नवसंजीवनी मिळाली आहे. धारणी शहरातील एका शासकीय कर्मचाऱ्याने हा जलसंधारणाचा आदर्श घालून दिला आहे. मेळघाटात दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाई, कोरड्या पडणाऱ्या बोअरवेल्स आणि घटत्या भूजल पातळीची समस्या असते. अशा परिस्थितीत हा छोटासा प्रयोग अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. धारणी येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये वरिष्ठ लिपिक पदावर कार्यरत असलेले योगेश मालवीय यांनी हा अभिनव प्रयोग केला आहे. मालवीय यांनी आपल्या राहत्या घरावर पडणाऱ्या पावसाच्या प्रत्येक थेंबाचे महत्त्व ओळखून ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ची संकल्पना प्रत्यक्षात आणली. या उपक्रमामुळे सकारात्मक परिणाम दिसून येत असून, गावातील बोअरवेलमधून पाणी मिळवणे आता शक्य झाले आहे. दरवर्षी लाखो लिटर पावसाचे पाणी वाहून जाते. हे पाणी जमिनीत मुरल्यास अनेक बोअरवेल्सना जीवनदान मिळू शकते, या विचाराने प्रेरित होऊन योगेश मालवीय यांनी मार्च महिन्यातच हा प्रयोग करण्याचा निर्धार केला. त्यांनी आपल्या निवासस्थानी पाणी वाया जाऊ नये यासाठी नियोजन सुरू केले. या नियोजनाचा मुख्य उद्देश केवळ पाणी साठवणे नसून, ते जमिनीच्या गर्भात झिरपवून भूजल पुनर्भरण करणे हा होता. त्यांनी तयार केलेल्या व्यवस्थेतून छतावरील पाणी टाक्यात जमा होऊन बोअरवेल परिसरातील जमिनीत मुरले. यंदा १७ जून रोजी धारणी शहरात दमदार पावसाला सुरुवात झाली आणि त्यानंतरही चांगला पाऊस झाला. या काळात स्लॅबवर पडणारे संपूर्ण पावसाचे पाणी या नवीन व्यवस्थेतून जमिनीत झिरपत राहिले. अवघ्या काही दिवसांतच या प्रयोगाचे सकारात्मक परिणाम दिसू लागले. पूर्वी बोअरवेलमधून पाणी येण्यासाठी दहा ते पंधरा मिनिटे प्रतीक्षा करावी लागत होती, मात्र आता अवघ्या एका मिनिटात पाणी उपलब्ध होत आहे. धारणी तालुक्यातील राणीतंबोली येथील मूळ रहिवासी असलेले योगेश मालवीय शासकीय सेवेत असले तरी त्यांची सामाजिक संवेदनशीलता कायम आहे. मेळघाटातील अनेक भागांत उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण होते. अशा परिस्थितीत प्रत्येक घर, शाळा, कार्यालय, संस्था आणि सार्वजनिक इमारतींमध्ये ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ची व्यवस्था उभारल्यास भूजल पुनर्भरणाची एक मोठी चळवळ उभी राहू शकते, असे मालवीय यांनी म्हटले आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp