छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेसाठी शनिवारी मतदान: 12 जागांसाठी 31 उमेदवार रिंगणात, शुक्रवारी भेटीगाठींवर भर – Chhatrapati Sambhajinagar News

छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेसाठी शनिवारी मतदान:  12 जागांसाठी 31 उमेदवार रिंगणात, शुक्रवारी भेटीगाठींवर भर – Chhatrapati Sambhajinagar News



छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची (KDCC) अत्यंत चुरशीची निवडणूक शनिवारी पार पडत आहे. जिल्ह्याच्या राजकीय आणि आर्थिक सत्ताकेंद्राचे महत्त्व असलेल्या या निवडणुकीत एकूण १०५३ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. बँकेच्या एकूण २० जागांपैकी ८ संचालक यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित १२ जागांसाठी ३१ उमेदवार रिंगणात आपले नशीब आजमावत आहेत. यामुळे निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे. या निवडणुकीत एकूण १०५३ मतदार असून, छत्रपती संभाजीनगर तालुक्यात सर्वाधिक २६२ मतदार आहेत. यामध्ये विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था गटातून ७४, बिगरशेती गटातून १६८ आणि पणन प्रक्रिया गटातून २० मतदारांचा समावेश आहे. निवडणुकीच्या ऐन रंगात शिवसेना (ठाकरे गट) नेते अंबादास दानवे यांनी थेट ‘शेतकरी विकास पॅनल’मधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. दानवे यांच्या या धक्कादायक पावलामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात आणि अखेरच्या दिवशी सर्वच उमेदवारांनी प्रत्यक्ष भेटीगाठी आणि गुप्त बैठकांवर भर दिला. एक-एक मत महत्त्वाचे असल्याने मतदारांच्या मनधरणीसाठी रात्रीचा दिवस केला जात आहे. विशेषतः अंबादास दानवे यांच्या भूमिकेनंतर निर्माण झालेली गळती रोखण्यासाठी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी मतदारांशी संपर्क साधण्यावर पूर्ण जोर लावला आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp