
पुण्यात एका व्यक्तीची बांधकाम कंपनीत नोकरी देण्याच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी तीन लाख सात हजार रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार कोथरूड भागात राहतात. त्यांना सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर एक संदेश पाठवला होता. या संदेशात बांधकाम कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. चोरट्यांनी नोकरी मिळवण्यासाठी एक अभ्यासक्रम पूर्ण करावा लागेल, असे सांगितले. त्यानंतर त्यांनी तक्रारदाराला ऑनलाइन पद्धतीने पैसे पाठवण्यास सांगितले. तक्रारदाराने वेळोवेळी चोरट्यांच्या खात्यात एकूण तीन लाख सात हजार रुपये जमा केले. नोकरीबाबत विचारणा करण्यासाठी तक्रारदाराने चोरट्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला असता, तो बंद असल्याचे आढळले. यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राऊत या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. वादातून रिक्षाचालकाच्या डोक्यात कुंडी घातली वादातून रिक्षाचालकाला मारहाण करुन त्याच्या डोक्यात कुंडी घालण्यात आल्याची घटना मंगळवार पेठेतील सदानंदनगर परिसरात घडली. या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. महेश भगवानसिंग परदेशी (वय ४०, रा. सदानंदनगर, मंगळवार पेठ) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी पुष्कर राजू काळे (वय ३०), इम्रान उर्फ सबऱ्या तौफिक शेख (वय ३२), अकिब अन्वर सय्यद (वय ३८), बिलाल अन्वर सय्यद (चौघे रा. सदानंदनगर, मंगळवार पेठ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परदेशी यांनी याबाबत समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परदेशी हे रिक्षाचालक आहेत. ४ जुलै रोजी त्यांनी रिक्षा सोमनाथ मित्र मंडळाजवळ लावली. रात्री साडेदहाच्या सुमारास ते गप्पा मित्रांबरोबर गप्पा मारत थांबले होते. त्या वेळी आरोपींनी वादातून परदेशी यांना शिवीगाळ करुन मारहाण करण्यास सुरुवात केली. आरोपींनी त्यांच्या डोक्यात कुंडी घातली. मारहाणीत परदेशी जखमी झाले. सहायक फौजदार संजय काळेल तपास करत आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
