
आमच्या पक्षातून किंवा शरद पवारांच्या पक्षाकडून निवडून आलेल्या खासदारांना लोकांनी महायुतीच्याविरोधात निवडून दिले आहे. मग त्यांनी अस्वस्थ का व्हावे? असा सवाल उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. शरद पवार गटातील 5 ते 6 खासदार अस्वस्थ आहेत, पंतप्रधान मोदी आणि शहा त्यांच्यामागे लागले आहेत ते खासदार काय करतील सांगता येत नाही या पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानावर बोलताना राऊतांनी असे म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की, आमचे 6 खासदार यांनी फोडले. आम्ही काही त्यांना अस्वस्थ होते असे मानत नाही. तुम्ही शिवसेनेच्या मशाल चिन्हावर निवडून आलात, उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व तुम्ही स्वीकारले आणि निवडून आलात. तसेच अजित पवारांनी पक्ष फोडल्यावर शरद पवारांचा मुळ पक्षाने तुतारीवर निवडून लढवली. त्यांनी 10 उमेदवार उभे केले त्यापैकी 8 जागा निवडून आणल्या. कोणी अस्वस्थ असण्याचे काही कारण नाही मविआच्या उमेदवारांना लोकांनी मोदी, शहा, फडणवीस यांच्याविरोधात मतदान केले आहे,मग हे लोकं अस्वस्थ का आहेत. मोदी-शहांकडून दबावाचे राजकारण संजय राऊत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे दबावाचे राजकारण करतात, त्यातूनच त्यांनी हे खासदार गळाला लावले. पृथ्वीराज चव्हाण हे मोठे नेते आहेत त्यांच्याकडे असलेली माहिती त्यांनी शरद पवार यांना दिली असेल असे मला वाटते. आमचे 6 खासदार गेले ते का अस्वस्थ होते? कसला विकास करत आहेत? नरेंद्र मोदी वाराणसीचा विकास करू शकले नाही अजून. नागपुरात जाऊन बघा काय विकास आहे? विकास कसा कोसळतो आहे हे बघा तुम्ही. लोकांमध्ये राहून संघर्ष करायचा आणि पुढच्या निवडणुकीत आपण सत्तेत येऊ हा आत्मविश्वास ठेवला पाहिजे. 2029 मध्ये इंडिया आघाडी सरकारमध्ये येणार संजय राऊत म्हणाले की, 2029 मध्ये देशात इंडिया आघाडी सरकारमध्ये येणार आणि महाराष्ट्रातील भ्रष्ट सरकार आम्ही उखडून फेकून देऊ हा आमचा आत्मविश्वास आहे. शरद पवार यांच्या पक्षाकडून उमेदवारी घेत असताना किंवा उद्धव ठाकरेंकडून उमेदवारी घेताना तुम्हाला काही वाटले नाही का? आमच्या पक्षाकडून कष्ट करुण घेतले तेव्हा काही वाटले नाही का? आम्ही विरोधात आहोत तेव्हा तुम्ही उमेदवारी मागितली तेव्हा हे लक्षात आले नाही का? असा सवाल राऊत यांनी केला आहे. ..म्हणून एकनाथ शिंदेंशी भांडण संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत दरोडा टाकला अमित शहा यांच्या मदतीन हे आमचे भांडण्याचे कारण आहे. ते भाजपमध्ये गेले म्हणून आम्ही भांडत नाही.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
