digital products downloads

नागपुरात मायलेकीचा दुर्दैवी अंत: सुसाईड नोटमध्ये सासरच्यांना मृतदेह देण्यास नकार; काय आहे नेमके प्रकरण? – Nagpur News

नागपुरात मायलेकीचा दुर्दैवी अंत:  सुसाईड नोटमध्ये सासरच्यांना मृतदेह देण्यास नकार; काय आहे नेमके प्रकरण? – Nagpur News



नागपूरच्या नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका मायलेकीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संगीत ढबाले (आई) आणि आकांक्षा ब्रम्हे (विवाहित मुलगी) अशी मृतांची नावे असून, या दोघी नंदनवन परिसरात एकत्र राहत होत्या. बुधवारी रात्री उशिरा त्यांनी राहत्या घरातील लोखंडी अँगलला दोरीच्या साहाय्याने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच नंदनवन पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत दोघींना खाली उतरवून रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. कौटुंबिक वाद आणि तीव्र मानसिक तणावातून या दोघींनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून घटनेमागील नेमक्या कारणांचा अधिक तपास सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकांक्षा ब्रम्हे हिचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते, मात्र काही महिन्यांपूर्वीच तिच्या नवजात बाळाचा मृत्यू झाल्याने ती प्रचंड मानसिक तणावाखाली होती आणि आईकडे राहायला आली होती. अशातच, तिचा पती लोकेश ब्रम्हे हा शेती, घर आणि इतर मालमत्तेच्या वाटणीसाठी पत्नी व सासूसोबत सातत्याने वाद घालत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून, या मालमत्तेच्या वादातून आणि मानसिक त्रासातूनच या मायलेकींनी टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते. 30 एप्रिलच्या रात्री पती लोकेश ब्रम्हे याने घरी येऊन केलेल्या वादामुळे निर्माण झालेल्या मानसिक तणावातूनच या मायलेकींनी जीवनयात्रा संपवल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून, पोलिसांनी घटनास्थळावरून एक सुसाईड नोट देखील जप्त केली आहे. या चिठ्ठीत त्यांनी आपले अंत्यसंस्कार वडिलांच्या गावी करण्याची अंतिम इच्छा व्यक्त करतानाच, मृतदेह कोणत्याही परिस्थितीत सासरच्या लोकांकडे सोपवू नये, अशी स्पष्ट अट लिहिल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. नंदनवन पोलिसांनी याप्रकरणी सध्या आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, पती लोकेश ब्रम्हे याने मायलेकींना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा दाट संशय व्यक्त केला जात असून, या धक्कादायक घटनेमागचे नेमके वास्तव आणि कायदेशीर पुरावे शोधण्यासाठी पोलिस आता सखोल तपास करत आहेत.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp