माजी आमदार रामभाऊ मोझे यांचे निधन: राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रावर शोककळा, शरद पवारांचे होते विश्वासू – Pune News

माजी आमदार रामभाऊ मोझे यांचे निधन:  राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रावर शोककळा, शरद पवारांचे होते विश्वासू – Pune News



पुण्याचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार आणि प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ रामभाऊ गेनबा मोझे यांचे सोमवारी (१३ जुलै) अल्पशा आजाराने निधन झाले. ते जुन्या बोपोडी विधानसभा मतदारसंघाचे सलग तीन वेळा प्रतिनिधी होते. त्यांच्या निधनामुळे पुणे शहर आणि जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक तसेच शैक्षणिक वर्तुळात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर संगमवाडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. रामभाऊ मोझे हे पुणे जिल्ह्यातील एक प्रभावी आणि लोकप्रिय नेते म्हणून ओळखले जात होते. त्यांनी १९८०, १९८५ आणि १९९० मध्ये जुन्या बोपोडी मतदारसंघातून सलग तीन वेळा आमदार म्हणून विजय मिळवला. त्यावेळी ते काँग्रेस (सोशलिस्ट) पक्षाकडून निवडून आले होते. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे ते विश्वासू समर्थक मानले जात होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर त्यांनी पवारांसोबत काम केले, तर २०१२ मध्ये त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. येरवडा, बालेवाडी आणि संगमवाडी परिसरातील स्थानिक राजकारण आणि विकासात त्यांचा मोठा प्रभाव होता. राजकारणासोबतच शिक्षण क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान होते. सामान्य आणि गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे व्यावसायिक शिक्षण मिळावे, या उद्देशाने त्यांनी ‘गेनबा सोपानराव मोझे ट्रस्ट’ची स्थापना केली. या ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी प्राथमिक शाळांपासून ते अभियांत्रिकी, फार्मसी आणि इतर विविध तंत्रशिक्षण देणाऱ्या नामांकित व्यावसायिक शिक्षण संस्थांचे जाळे पुण्यात उभे केले. येरवडा, बालेवाडी आणि वाघोली परिसरात त्यांच्या संस्था आजही कार्यरत आहेत. त्यांच्या निधनाने पुणे शहराच्या विकासात मोलाचे योगदान देणारा एक कर्तव्यदक्ष नेता आणि शिक्षणमहर्षी हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp