
अयोध्येतील राम मंदिरात होत असलेल्या कथित गैरव्यवहार आणि लुटीच्या विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आक्रमक पवित्रा घेत ‘रामरक्षा’ हा नवा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत येत्या १८ जुलै २०२६ रोजी नागपुरात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे थेट निमंत्रण ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका पत्राद्वारे दिले आहे. या पत्रातून राऊतांनी मुख्यमंत्र्यांना त्यांच्या हिंदुत्वाची आठवण करून देत जोरदार राजकीय टोलाही लगावला आहे. ‘कडवट हिंदुत्ववादी’ म्हणत पत्राची सुरुवात खासदार संजय राऊत यांनी १५ जुलै २०२६ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे पत्र पाठवले आहे. या पत्राची सुरुवात करताना राऊत म्हणतात, “आपण एक प्रखर रामभक्त आणि कडवट हिंदुत्ववादी आहात. अयोध्येतील राम जन्मभूमी मुक्त करण्याच्या आंदोलनात आपण सहभागी झाल्याचे आपण नेहमी सांगता. आपल्यासारख्या लाखो राम भक्तांच्या संघर्षातून राम जन्मभूमी मुक्त झाली व अयोध्येत श्रीराम मंदिर उभे राहिले.” अयोध्येतील गैरव्यवहारावर ठेवले बोट राम मंदिराच्या उभारणीचे कौतुक केल्यानंतर राऊतांनी लगेचच तिथे सुरू असलेल्या कथित गैरव्यवहारावर बोट ठेवले आहे. पत्रात पुढे म्हटले आहे की, “याच राम मंदिरात आता चोरी, लुटमार, फसवणूक असे गुन्हे घडत आहेत व शेकडो कोटींचा अपहार झाला आहे. खुद्द राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) अयोध्येतील या चोरीबाबत ‘शोक’ व्यक्त केला आहे.” ‘रामरक्षा म्हणजे रामाची सुरक्षा’ अयोध्येतील या प्रकारावर भाष्य करताना राऊतांनी ठाकरे गटाच्या नव्या उपक्रमाची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली आहे. “शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने या राम मंदिर लुटीबाबत लोकांत जागृती आणण्यासाठी ‘रामरक्षा’ उपक्रम सुरू केला आहे. रामरक्षा म्हणजे रामाची सुरक्षा हे समजून घ्या,” असे राऊत यांनी पत्रात ठळकपणे नमूद केले आहे. मुख्यमंत्र्यांना नागपूरच्या कार्यक्रमाचे निमंत्रण येत्या शनिवारी, १८ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ४.३० वाजता नागपूर येथील रामनगरमधील राम मंदिरात या ‘रामरक्षा’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वतः उपस्थित राहणार आहेत. “सदर कार्यक्रम नागपुरात होत असल्याने आपण या ‘रामरक्षा’ उपक्रमात आवर्जून सहभागी होऊन राम भक्तांना शुभेच्छा द्याव्यात, ही आग्रहाची विनंती!” असे आवाहन संजय राऊत यांनी या पत्राच्या शेवटी केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यातच होणाऱ्या या कार्यक्रमाचे त्यांनाच निमंत्रण दिल्याने राजकीय वर्तुळात या पत्राची चांगलीच चर्चा रंगली आहे. संजय राऊतांने मुख्यमंत्री फडणवीसांना लिहलेले पत्र.. हेही वाचा.. तुकाराम मुंढेंची ग्राहकांसाठी मोठी घोषणा:’अन्न असो किंवा औषध, फक्त बोला… तक्रार आपोआप तयार होईल’, FDA चे अत्याधुनिक पोर्टल लाँच भेसळयुक्त अन्नपदार्थ किंवा बनावट आणि निकृष्ट दर्जाच्या औषधांविरोधात आता नागरिकांना तक्रार नोंदवण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार नाही. महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित नवीन तक्रार नोंदणी प्रणाली सुरू केली असून, मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत बोलताच तक्रार आपोआप तयार होणार आहे. या सुविधेची माहिती FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे दिली आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
