संजय राऊतांची वैचारिक सुंता झालीय: उद्धव ठाकरेंना पश्चाताप होत असेल तर त्यांनी एकनाथ शिंदेंच्या मूळ शिवसेनेत जावे- नवनाथ बन – Mumbai News

संजय राऊतांची वैचारिक सुंता झालीय:  उद्धव ठाकरेंना पश्चाताप होत असेल तर त्यांनी एकनाथ शिंदेंच्या मूळ शिवसेनेत जावे- नवनाथ बन – Mumbai News



संजय राऊत यांची वैचारिक सुंता झाली आहे हे त्यांनी आज पुण्यात मान्य केले आहे. अब्दुला म्हणजे कोण तर औरंगजेब फॅन क्लब चालवतात, त्याच्या कबरीवर जात डोकं टेकवतात असे अब्दुला म्हणजे संजस राऊत आहेत हे त्यांनी स्वत: मान्य केले. त्यांची देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्याची पात्रता नाही, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. अब्दुला असल्याने जनतेने तुम्हाला घरी बसवले आहे. नवनाथ बन म्हणाले की, उबाठा गट ही सोनिया गांधी यांची बेनामी तर राहुल गांधी यांची उपशाखा आहे. राहुल गांधी यांचा महाराष्ट्रातील पक्ष म्हणजे उबाठा गट आहे. उबाठाने बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडत संपूर्ण पक्ष सोनिया गांधींच्या दावणीला बांधला आहे. शिंदे गटावर टीका करण्यापूर्वी राऊतांनी आपल्या पक्षाकडे पाहिले पाहिजे. काँग्रेसने सावरकरांचा, बाळासाहेब यांचा अपमान केला त्यांच्याच दावणीला तुम्ही पक्ष नेऊन बांधला आहे. उद्धव ठाकरे यांना जर पश्चताप होत असेल तर त्यांनी मुळ शिवसेनेचा विचार स्वीकारला पाहिजे. ती एकनाथ शिंदेंची आहे, त्यांच्याकडे उद्धव ठाकरेंनी गेले पाहिजे, असे बन यांनी म्हटले आहे.
‘आधी अप्रिय वाटायचे, आता प्रिय कसे झाले? नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत कायम आदित्य ठाकरे यांना अप्रिय म्हणून बघत असताना आज वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांना प्रिय म्हणत आहेत. आदित्य ठाकरेंना माझा एकच सल्ला आहे, उबाठा गटाच्या जहाजेला राऊतांनी मोठे होल पाडले आहे, त्यामुळे जोपर्यंत त्यांना दूर करत नाही तोपर्यंत उबाठा गटाचे जहाज आणखी खोलामध्ये जाईल. राऊतांनी काँग्रेसकडून उबाठा गट संपवण्याची सुपारी घेतली आहे. राऊतांना दूर करत नाही तोपर्यंत ना उबाठाचे काही आहे ना आदित्य ठाकरे यांचे काही खरं आहे. वीकेंडला काम करून पक्ष चालत नसतो नवनाथ बन म्हणाले की, उद्धव ठाकरे आठवड्याचे 5 दिवस घरी बसतात आणि केवळ रविवारी पक्षाचे काम करतात, पक्षाची बैठक घेतात. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी घरात बसून काम केले. आता विरोधात असताना 5 ते 6 महिन्यातून एखाद्या रविवारी खासदारांची बैठक घेतात. त्यामुळे खासदार, आमदार आणि पदाधिकारी तुमच्यासोबत राहणार नाही. विकेंडला काम केल्याने पक्ष चालत नसतो. हे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी लक्षात घेतले पाहिजे. मुळात उबाठाचे लोकं तुम्ही भेटत नसल्याने वैतागले आहेत. मातोश्रीचे दरवाजे शिवसैनिकांसह आमदार, खासदारांना आणि राऊतांसाठीही बंद आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp