digital products downloads

शिंदे शिवसेनेच्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड: जिल्हा समन्वयकपदी जगदीश पाटील यांची नियुक्ती‎ – Jalgaon News

शिंदे शिवसेनेच्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड:  जिल्हा समन्वयकपदी जगदीश पाटील यांची नियुक्ती‎ – Jalgaon News



मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरावलोकन कार्यक्रमांतर्गत बीएलए प्रतिनिधींची आढावा बैठक तसेच शिवसेनेचा विधानसभा मेळावा उत्साहात पार पडला. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमाची सखोल माहिती कार्यकर्त्यांना मिळावी, या उद्देशाने आमदार ॲड. अमोल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, युवासेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. मनोज पाटील उपस्थिती होती. यावेळी शिवसेनेत नव्याने सहभागी झालेल्या पदाधिकारी व लोकप्रतिनिधींना विविध पदांची जबाबदारी सोपवण्यात आली. जगदीश पाटील यांची जिल्हा समन्वयकपदी, जावेद मुजावर यांची अल्पसंख्यांक आघाडी उपजिल्हाप्रमुखपदी, माजी नगरसेवक अभिजीत पाटील यांची उपजिल्हा समन्वयक पदी नियुक्ती करण्यात आली. अतुल महाजन यांना ओबीसी सेल, तालुकाप्रमुख, ॲड. अहमद सय्यद यांना अल्पसंख्यांक आघाडी तालुकाप्रमुख, माजी उपनगराध्यक्ष कुणाल महाजन यांना तालुका समन्वयक पदाची जबाबदारी देण्यात आली.मोहन सैंदाणे यांची युवासेना उपतालुकाप्रमुख, नगरसेवक अनिल महाजन यांची ओबीसी सेल शहरप्रमुख, तर अल्ताफ खान यांची अल्पसंख्यांक आघाडी शहरप्रमुख म्हणून नियुक्ती जाहीर करण्यात आली. कार्यक्रमात माजी जि.प. उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, कृ.उ.बा.चे माजी सभापती शालिग्राम गायकवाड, ओबीसी सेल जिल्हाप्रमुख रुपेश माळी, तालुकाप्रमुख रवींद्र जाधव, विधानसभा क्षेत्र प्रमुख सुदाम राक्षे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp