digital products downloads

जलतरण तलाव प्रकल्पातील भ्रष्टाचार भोवला: सातारा जिल्हा क्रीडाधिकारी नितीन तारळकर निलंबित, क्रीडा संचालनालयाची कारवाई – Kolhapur News

जलतरण तलाव प्रकल्पातील भ्रष्टाचार भोवला:  सातारा जिल्हा क्रीडाधिकारी नितीन तारळकर निलंबित, क्रीडा संचालनालयाची कारवाई – Kolhapur News



सोलापूर व सातारा येथील जलतरण तलाव प्रकल्पांमध्ये कथित भ्रष्टाचार केल्याचा ठपका ठेवत सातारा जिल्हा क्रीडाधिकारी नितीन तारळकर यांना निलंबित करण्यात आले आहे. याबाबत महाराष्ट्र क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे सहसंचालक सुधीर मोरे यांनी अधिकृत आदेश जारी केले आहेत. प्राप्त माहितीनुसार, सोलापूर आणि सातारा येथील जलतरण तलावांशी संबंधित आर्थिक व्यवहारांमध्ये अनियमितता झाल्याची तक्रार समोर आली होती. या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर चौकशी सुरू करण्यात आली असून, प्राथमिक तपासात काही गंभीर बाबी निदर्शनास आल्याचे सांगितले जाते. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ कारवाई करत तारळकर यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, निलंबनाचा आदेश जारी झाल्याच्याच दिवशी नितीन तारळकर रजेवर गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सोलापूर व सातारा येथील दोन्ही कार्यालयांतील कारभाराची सखोल चौकशी सुरू असून, या प्रकरणात आणखी काही धक्कादायक बाबी उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे क्रीडा विभागात खळबळ उडाली असून, संबंधित प्रकल्पांच्या कामकाजावरही याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रशासनाने पारदर्शक चौकशीचे आश्वासन दिले असून, दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp