उपमुख्यमंत्री पवार यांनी ‘पुणे ग्रँड टूर’ तयारीचा आढावा घेतला: स्पर्धेसाठी नियामक परिषद स्थापन करण्याचे निर्देश दिले – Pune News

उपमुख्यमंत्री पवार यांनी ‘पुणे ग्रँड टूर’ तयारीचा आढावा घेतला:  स्पर्धेसाठी नियामक परिषद स्थापन करण्याचे निर्देश दिले – Pune News



उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी ‘पुणे ग्रँड टूर’ सायकल स्पर्धेच्या आगामी पर्वाच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी स्पर्धेचा दर्जा आणि व्याप्ती वाढवण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन केले. तसेच, स्पर्धेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी नियामक परिषद स्थापन करण्याचे निर्देशही दिले. ही आढावा बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. यामध्ये पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे, आमदार शंकर मांडेकर, विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, क्रीडा व युवक सेवा आयुक्त दीपक सिंगला, पीएमआरडीएच्या अतिरिक्त आयुक्त मंजुलक्ष्मी के., अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल आणि सीएफआयचे महासचिव मनिंदर पाल सिंह (दूरदृष्य प्रणालीद्वारे) उपस्थित होते. उपमुख्यमंत्री पवार यांनी स्पष्ट केले की, आगामी ‘पुणे ग्रँड टूर’चे उद्दिष्ट केवळ मागील वर्षाची पुनरावृत्ती करणे नाही. ही स्पर्धा शहरापासून ग्रामीण भागापर्यंत पोहोचवून तिचा आनंद सर्वांनी घेतला पाहिजे. मागील वर्षीची स्पर्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठबळाने यशस्वी झाली होती. या ‘ग्रँड टूर’ची संकल्पना आणि ती प्रत्यक्षात आणण्याचा पाया तत्कालीन उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांनी रचला होता. पुणे हे केवळ शैक्षणिक, औद्योगिक आणि सांस्कृतिक केंद्र न राहता जागतिक दर्जाच्या क्रीडा स्पर्धांचे केंद्र बनावे, महाराष्ट्रातील युवकांना सायकलिंगसाठी व्यासपीठ मिळावे आणि पुण्याचे आंतरराष्ट्रीय क्रीडा नकाशावर वेगळे स्थान निर्माण व्हावे, ही त्यांची दूरदृष्टी होती, असे सुनेत्रा पवार यांनी सांगितले. आगामी स्पर्धेमुळे ऐतिहासिक वास्तू आणि स्थळे जगाच्या पटलावर येऊन पर्यटनाला चालना मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आगामी स्पर्धेसाठी राज्य शासन, स्थानिक स्वराज्य संस्था, नागरी संस्था आणि सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांची एक नियामक परिषद (गव्हर्निंग कौन्सिल) स्थापन करावी, असे निर्देश देण्यात आले. या परिषदेने दरमहा बैठक घेऊन तयारीचा आणि प्रगतीचा आढावा घ्यावा. ही परिषद ‘पुणे ग्रँड टूर’ची सर्वोच्च धोरणात्मक आणि देखरेख करणारी संस्था असावी, असेही त्यांनी नमूद केले.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp