पुण्यात नवोदितांसाठी विनामूल्य अभिनय मार्गदर्शन शिबीर: दिग्दर्शक मधुर भांडारकर, मृणाल कुलकर्णींसह चित्रपटसृष्टीतील दिग्गजांचे थेट मार्गदर्शन – Pune News

पुण्यात नवोदितांसाठी विनामूल्य अभिनय मार्गदर्शन शिबीर:  दिग्दर्शक मधुर भांडारकर, मृणाल कुलकर्णींसह चित्रपटसृष्टीतील दिग्गजांचे थेट मार्गदर्शन – Pune News



चित्रपट, नाट्य आणि मनोरंजन क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या नवोदित कलाकार, दिग्दर्शक, लेखक आणि कलावंतांसाठी दादासाहेब फाळके फिल्म इन्स्टिट्यूटतर्फे पुण्यात भव्य विनामूल्य अभिनय मार्गदर्शनपर चर्चासत्र आणि परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, २८ जून २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले आणि दादासाहेब फाळके फिल्म इन्स्टिट्यूटचे संस्थापक राजाराम कोरे यांच्या हस्ते होईल. यावेळी चित्रपट, नाट्य, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. या परिसंवादात पद्मश्री दिग्दर्शक मधुर भांडारकर, साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेते रवी प्रकाश, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, प्रसिद्ध कास्टिंग डायरेक्टर विकी सिदाना, व्यक्तिमत्त्व विकास प्रशिक्षक केदार आठवले, कंटेंट क्रिएटर विराज अवचिते, राहुल चव्हाण, सुनीता चव्हाण तसेच अभिनेते विजय आंधळकर यांसारखे दिग्गज सहभागी होणार आहेत. चित्रपटसृष्टीतील संधी, अभिनय प्रशिक्षण, ऑडिशनची तयारी, कास्टिंग प्रक्रिया, व्यक्तिमत्त्व विकास, व्हॉईस ट्रेनिंग, डिजिटल माध्यमांतील करिअरच्या संधी तसेच बदलत्या चित्रपट आणि नाट्य क्षेत्रातील प्रवाह याबाबत तज्ज्ञांकडून प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळेल. नवोदित कलाकारांना उद्योगातील वास्तव समजून घेण्यासह यशस्वी करिअर घडवण्यासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करण्याची संधी या परिसंवादातून मिळणार आहे. चित्रपट आणि नाट्य क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करण्याची इच्छा असलेल्या सर्व इच्छुकांनी या विनामूल्य परिसंवादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp