येरवडा येथे तरुणावर शस्त्राने हल्ला: आरडाओरडा करणाऱ्या टोळक्याला जाब विचारल्याने घडली घटना – Pune News

येरवडा येथे तरुणावर शस्त्राने हल्ला:  आरडाओरडा करणाऱ्या टोळक्याला जाब विचारल्याने घडली घटना – Pune News



येरवडा परिसरात आरडाओरडा करणाऱ्या टोळक्याला जाब विचारल्याने एका तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने हल्ला करण्यात आला. या घटनेनंतर परिसरात दहशत माजली होती. विश्रांतवाडी पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे, तर इतर साथीदारांचा शोध सुरू आहे. ही घटना १२ जून रोजी मध्यरात्री अडीचच्या सुमारास येरवड्यातील पंचशीलनगर परिसरात घडली. जखमी तरुणाचे नाव उमेश मंगलदास गायकवाड (वय ३२, रा. पंचशीलनगर, येरवडा) असे आहे. गायकवाड आणि त्यांचे मित्र त्या वेळी परिसरात थांबले होते. त्याच वेळी आरोपी शोएब रशीद कुरेशी (वय २६, रा. पंचशीलनगर, येरवडा) आणि त्याचे तीन साथीदार तेथे मोठ्याने आरडाओरडा करत होते. गायकवाड यांनी त्यांना शांत राहण्यास सांगितले. यावरून कुरेशी आणि त्याच्या साथीदारांनी गायकवाड आणि त्यांच्या मित्राला शिवीगाळ करत मारहाण केली. या मारहाणीदरम्यान, आरोपींनी उमेश गायकवाड यांच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. घटनेनंतर आरोपी पसार झाले होते. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत शोएब रशीद कुरेशी याला अटक केली आहे. त्याच्यासोबत असलेल्या इतर तीन साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल माने करत आहेत. रिक्षा प्रवासी महिलेचे दागिने चोरी रिक्षा प्रवासी ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील एक लाख रुपयांची सोनसाखळी चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार ज्येष्ठ महिला सोमवार पेठेत राहायला आहेत. त्या १४ जून रोजी रास्ता पेठेतील पाॅवर हाऊस चौकातून मार्केटयार्डकडे रिक्षातून निघाल्या हाेत्या. रिक्षात अन्य प्रवासी होते. प्रवासादरम्यान महिलेच्या गळ्यातील एक लाख रुपयांची सोनसाखळी चोरट्यांनी लांबविली. पोलीस कर्मचारी एस शेख तपास करत आहेत.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp