
ठाकरे गटातून कालच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अधिकृत प्रवेश केलेले खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकार परिषदेत अत्यंत आक्रमक आणि हिंसक भाषेचा वापर करत विरोधकांना उघड आव्हान दिले आहे. “माझं ठाकरे गटाच्या सामान्य कार्यकर्त्यांशी वैमनस्य नाही, त्यांच्यामुळेच मी खासदार झालो. पण जर कोणी माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबाकडे वाकड्या नजरेने पाहिले, तर त्यांनी आधी स्वतःचा मेडिक्लेम आणि लाईफ इन्शुरन्स काढून ठेवावा, कारण माझ्या नादाला लागणारे थेट हॉस्पिटल किंवा स्मशानातच जातील, असा इशारा त्यांनी दिला आहे. मला पोलिस सुरक्षा नको; पोलिस नसले तरी आमच्याकडे सगळ्या गोष्टी असतात!
ठाकरे गटाकडून होणाऱ्या संभाव्य आंदोलनांवर किंवा हल्ल्याच्या इशाऱ्यावर बोलताना संजय दिना पाटील यांनी जुन्या कौटुंबिक इतिहासाचा दाखला दिला. ते म्हणाले, मला पोलिस संरक्षण नको ही माझी विनंती आहे. पोलिस सोबत असले की ते मला कोणाला मारू देणार नाहीत, अडवतील. मी वाट बघतोय, त्यांनी हल्ला करायला यावं, म्हणजे मी त्यांना मारू शकेन. पूर्वी माझ्या वडिलांच्या वेळी काही जण हल्ला करायला आले होते, तेव्हा आम्ही पाच लोक मारले होते. आम्ही कोणा भाई लोकांच्या जिवावर नाही, तर स्वतःच्या जिवावर लढणारे आहोत. घरात घुसून मारू, तुम्ही कितीही सुरक्षा ठेवा, मी थेट बॉम्ब टाकेन.” ठाकरे गटातील बड्या नेत्यावर गंभीर आरोप पक्षांतराचे खरे कारण सांगताना संजय दिना पाटील यांनी ठाकरे गटातील एका बड्या नेत्यावर नाव न घेता निशाणा साधला आणि उद्धव ठाकरेंचा एक जुना प्रसंग सांगितला. “माझा उद्धवजी किंवा आदित्य यांच्याशी वाद नाही, महानगरपालिका निवडणुकीच्या वेळी तिकीट वाटपावरून उद्धव ठाकरेंनी माझ्यासमोर हात जोडून अडचण व्यक्त केली होती, तेव्हा मी स्वतः माघार घेतली होती. मात्र, ठाकरे गटातील एका अहंकारी नेत्याने माझ्या घरासमोर येऊन शिव्या दिल्या, माझ्या 40 शाखाप्रमुखांपैकी एकालाही पद किंवा तिकीट मिळू दिले नाही. त्या नेत्याची अवस्था कुत्र्यासारखी झाली असून त्याला लोकांनी पाया पडावे असे वाटते. त्याच्यामुळेच मी पक्ष सोडला,” असा गौप्यस्फोट त्यांनी केला. संजय दिना पाटील एका हिन्दी वृत्तवाहिनीशी बोलत होते. हे ही वाचा.. मातोश्रीबाहेर नीतेश राणेंसाठी बॅनरबाजी: ठाकरेंच्या निवासस्थानासमोर राणेंचा ‘हिंदू गब्बर’ आणि ‘वस्ताद’ असा उल्लेख, राजकीय चर्चांना उधाण भाजपचे नेते नीतेश राणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुंबईतील राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा मोठा ठिणगी पडली आहे. मुंबईतील कलानगर परिसरात, थेट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’ बंगल्याच्या बाहेरच राणे समर्थकांनी मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी केली आहे. या बॅनरवर नीतेश राणे यांचा उल्लेख ‘हिंदू गब्बर’ आणि ‘वस्ताद’ असा करण्यात आला आहे. यामुळे ठाकरे आणि राणे समर्थकांमधील वाद पुन्हा एकदा विकोपाला जाण्याची चिन्हे आहेत. सविस्तर वाचा
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
